महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई सेंट्रल स्थानकातील बॅग सॅनिटायझर मशीन धूळखात; १८ लाख रुपयांच्या महसुलावर पाणी! - बॅग सॅनिटायझर मशीन

पश्चिम रेल्वेद्वारे(Western Railway) मुंबई सेंट्रल स्थानकावर(Mumbai Central) प्रवाशांच्या बॅग आणि इतर सामग्री सॅनिटाईझ करण्यासाठी सॅनिटायझर मशीन(Sanitize Machine) बसवली होती. मात्र, सद्या ही मशीन बंद असून धूळखात पडली आहे.

luggage sanitizer machine
सॅनिटायझर मशीन

By

Published : Nov 16, 2021, 8:28 PM IST

मुंबई - कोरोना काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे(Western Railway) मुंबई सेंट्रल स्थानकावर(Mumbai Central) प्रवाशांच्या बॅग आणि इतर सामग्री सॅनिटाईझ करण्यासाठी सॅनिटायझर कक्षाची(Sanitize Machine) उभारणी केली होती. मात्र, आठ महिन्यांतच मशीन बंद पडले असून ती धूळखात पडली होती. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेला खासगी कंत्राटदाराकडून मिळणारी परवाना रक्कम मिळाली नसल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

अल्प प्रतिसादामुळे मशीन बंद -

गेल्या वर्षी कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प होता. त्यामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांत प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता कोविड विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात आलेल्या होत्या. कोरोना काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर बॅग आणि इतर सामग्री सॅनिटाईझ करण्यासाठी अत्याधुनिक सॅनिटायझर मशिनी बसवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांचा अल्प प्रतिसादामुळे रेल्वे स्थानकांवरील सॅनिटायझर मशीन आज धूळखात पडून आहे. त्यामुळे सॅनिटायझर मशीन लावणाऱ्या कंत्राटदारांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

आठ महिन्यांतच मशीन बंद-

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेद्वारे मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांच्या बॅग आणि इतर सामग्री सॅनिटाइझ करण्यासाठी सॅनिटायझेर मशीनची फेब्रुवारी 2021 मध्ये उभारणी केली होती. मात्र, आठ महिन्यांतच मशीन बंद पडली असून धूळखात पडली होती. सॅनिटायझेर आणि पॉलिथिन रॅपिंगच्या सुविधा खासगी तत्वावर सुरू केली होती. या मशिनीतून जाताना अल्‍ट्रावॉयलेट रे सॅनिटायझेरची फवारणी बॅगा, इतर सामग्रीवर होत होती. परिणामी, यावरील विषाणू मारले जातील. यासह कोरोना आणि अन्य संसर्गजन्य विषाणू पसरण्यास अटकाव होईल, असा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला होता.

रेल्वेला वार्षिक 18 लाख रुपये महसूल -

मुंबई सेंट्रल स्थानकावर लावलेल्या सॅनिटायझर मशीनसाठी पश्चिम रेल्वे परवाना शुल्क म्हणून वार्षिक 18 लाख रुपये मिळणार होते. मात्र, खासगी कंत्राटदाराने परवाना शुल्क न भरल्याने ही मशीन बंद पडली होती. तर, आता दुरावस्थेत असलेली मशीन पश्चिम रेल्वेने नुकताच हटविली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, खासगी कंत्राटदाराकडून मिळणारे परवाना शुल्क भरले नाही. त्यामुळे ही मशीन बंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details