मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 13 हजार 659 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
24 तासांत 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात कमी 13 हजार 659 कोरोना रुग्णांचे निदान झाले. 10 मार्च 2021रोजी आजच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 19 हजार 224 इतकी झाली आहे. तसेच आज राज्यात 21 हजार 776 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 55 लाख 28 हजार 834 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिकाा- 863
ठाणे - 175
ठाणे महानगरपालिका- 151
कल्याण डोंबिवली महापालिका- 146
पालघर- 368
वसई विरार- 194
रायगड- 609
नाशिक- 248
नाशिक मनपा- 182
अहमदनगर- 707
जळगाव- 150
पुणे- 923
पुणे मनपा- 398
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 276
सोलापूर- 479
सातारा - 1348
कोल्हापूर- 1095
कोल्हापूर मनपा- 311
सांगली- 759
सांगली मनपा- 137
सिंधुदुर्ग- 631
रत्नागिरी- 653
औरंगाबाद- 122
औरंगाबाद मनपा- 110
जालना- 103
उस्मानाबाद- 484
बीड- 250
अमरावती- 252
अमरावती मनपा- 115
यवतमाळ- 152
नागपूर मनपा- 119
चंद्रपूर- 100
हेही वाचा- BreakTheChain : राज्यात सरसकट शिथिलता नाही; स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्बंधांबाबत ठरवेल