मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विहार जलशुद्धीकरण केंद्रातील १२०० मिली मीटर फिल्टर बायपास जलवाहिनी ही दुसऱ्या १२०० मिली मीटर जलशुद्धीकरण पाण्याची वाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात ( water pipeline work in Vihar ) येणार आहे. हे काम ५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामादरम्यान महानगरपालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे.
या विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा -गुरूनानक नगर, गैबन शाह दर्गा रोड, सलमा कंपाऊंड, एन. एस. एस. मार्ग, शिवाजी नगर संपूर्ण काजूपाडा, सुंदरबाग गल्ली, इंदिरा नगर, गणेश मैदान, बुद्धपर्ण कुटीर, प्रिमियर रोड काळे मार्ग ते ब्राम्हणवाडी, कोहिनूर सिटी, नौपाडा, राजू बेडेकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), कमानी, ख्रिश्चन गांव, जय अंबिका नगर, भारतीय नगर, हलाव पूल, कोहिनूर रुग्णालय, मसरानी गल्ली या विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग) (अंशतः), पाईप मार्ग, एम. एन. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), क्रांती नगर, संदेश नगर, वाडिया वसाहत, किस्मत नगर, शांती नगर, विनोबा भावे नगर, बुद्ध वसाहत, ब्राम्हणवाडी, ‘एल’ विभाग कार्यालय, एस. जी. बर्वे मार्ग, न्यू मिल मार्ग, पारीख खादी, सर्वेश्चर मंदीर मार्ग, टाकीया वार्ड, मॅच फॅक्टरी गल्ली, कपाडिया नगर, बेलग्रामी मार्ग, टॅक्सीमॅन वसाहत, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), हरीयानवाला गल्ली, सी. एस. टी. मार्ग, कल्पना नगर, महाराष्ट्र नगर, भाभा रुग्णालय, चुनाभट्टी पंपिंग भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पाणी जपून वापरा- ५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत पाण्याची वाहिनी जोडण्याचे काम केले जाणार आहे. या कालावधीत काही विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा ( low pressure water ) होणार आहे. त्या परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा पुरेसा साठा करून ( adequate water storage ) ठेवावा. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात ( Brihanmumbai Municipal Corporation administration ) आली आहे.