महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

व्हॅलेंटाईन विशेष : प्रेमा तुझा 'राजकीय' रंग कसा? - digvijay sing

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू आहे. तसेच अनेकांची प्रेम प्रकरणे वेळोवेळी समोर येत राहिली आहेत.

love affair of politicle leader in india
प्रेमा तुझा 'राजकीय' रंग कसा?

By

Published : Feb 14, 2021, 7:21 PM IST

Updated : Feb 14, 2021, 8:00 PM IST

मुंबई -राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या प्रेम प्रकरणांची चर्चा सुरू आहे. तसेच अनेकांची प्रेम प्रकरणे वेळोवेळी समोर येत राहिली आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणातून सरकार सावरत नाही, तर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड एका तरुणीच्या मृत्यूमुळे वादात अडकले आहेत. सरकारमधील मंत्र्यांच्या खासगी बाबी चव्हाट्यावर यायल्या लागल्याने विरोधी पक्ष भाजपला आयता मुद्दा मिळत आहे. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत' राजकीय प्रेम रंगाचे हे खास पॅकेज घेऊन आले आहे.

रिपोर्ट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांचे नाव -

सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे. या आत्महत्येमागे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय राठोड कारणीभूत असल्याचा आरोप भाजपकडून खुलेआम करण्यात येत आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप ही सोशल मीडिया आणि प्रसारमध्यमांवर प्रसारित झाले आहेत. ज्यामध्ये पूजा ही एका नेत्याशी बोलत आहे. आता हा नेता कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, जेंव्हापासून हे प्रकरण समोर आले, तेव्हापासून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा फोन नॉट रीचेबल झाला आहे. तसेच सध्या ते कुठे आहेत, याची माहितीदेखील कोणाकडे नाही. यासंबंधी सत्ताधारी नेत्यांनी कमालीची गुप्तता ठेवली आहे. पूजा चव्हाण या बीडमधील तरुणी पुण्यात आत्महत्या करते. या आत्महत्यामागे अनैतिक संबंधांचादेखील संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार, याकडे सगळयांचे लक्ष आहे. तसेच या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याने पोलिसांवर तपासात राजकीय दबाव असल्याचा ही आरोप होतो आहे.

धनंजय मुंडेंवरही बलात्काराचा आरोप-

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील दुसरा विवाह केल्याची कबुली दिली. त्यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा असून हे जाहीरपणे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे आणि करुणा यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यदेखील आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी करुणा यांची लहान बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांनी तिच्यावर बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो, असे सांगत गेली काही वर्षे बलात्कार करत आल्याची तक्रार पोलिसांत केली होती. या तक्रारीनंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले होते. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी सात्यताने मागणी भाजप नेत्यांकडून केली जात होती. पण थोड्याच दिवसानंतर रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा काही दिवसांनंतर धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई पोलीस कमिश्नर यांच्याकडे तक्रार केली असून, धनंजय मुंडे आपल्या मुलांना भेटू देत नाही, त्यांनी मुलांना शासकीय निवासस्थानी डांबून ठेवले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे या दुसऱ्या प्रेमाचा फटका धनंजय मुंडे यांना चांगलाच पडला, असे म्हणता येईल.

गोपोनाथ मुंडे यांचे प्रकरणही गाजले -

महाराष्ट्रातील दिग्गच नेते म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेम प्रकरणाची राज्यातच नाही, तर देशभरात चर्चा झाली. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्रीही होते. त्यावेळी त्यांचे नाव लावणी नृत्यांगना बरखा यांच्याशी जोडले गेले होते. अण्णा हजारे यांनी एराँन प्रकल्पाबाबत भरष्टाचाराची काही पुरावे समोर आणले. त्या कागदपत्रात बरखा गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर मुंबईत एक फ्लॅट आल्याची माहिती समोर आली. त्या पुराव्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि बरखा यांच्यातील नाते जगासमोर आले. या नात्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. गोपीनाथ मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. मात्र, त्यावेळी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या मागे उभे राहिले आणि भरसभेत 'प्यार किया तो डरना क्या' म्हणत गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा दिला. त्यामूळे गोपीनाथ मुंडे यांचा राजीनामा टळला होता.

माजी मंत्री लक्षण ढोबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा -

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप यांच्याच शिक्षण संस्थेतील एका महिलेने केला होता. 2014 मधील हे प्रकरण असून बोरीवली पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोरीवलीच्या गोराई भागात लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेचे नालंदा महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेनेचे ही तक्रार केली होती. 2011 ते 2013 या कालावधीत तिच्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार या महिलेने केली. काही कागदपत्रे घेऊन पाहणीसाठी आपल्याला बोलावून आणि प्राचार्याच्या दालनात नेऊन मारहाण करत बलात्कार केल्याचा आरोप महिलेलने केला होता. तसेच या संबंधी कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांची प्रेम कहाणी -

राज्याप्रमाणेच देशातील काही नेत्यांची प्रेम प्रकरण चांगलीच गाजली. काँग्रेस नेते शशी थरुर आणि व्यावसायिक सुनंदा पुष्कर यांचे प्रेम प्रकरण ही चांगलेच गाजले. 2010 मध्ये त्यांच्या नात्यांची चर्चा सगळीकडे सुरू होती. एका कार्यक्रमात सुनंदा पुष्कर आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांची भेट झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ते दोघे विवाह बंधनात अडकले. मात्र, दोनच वर्षात त्यांच्या संबंधात कटुता आल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारमुळे दोघांमध्ये कटुता वाढत गेली, असे सांगण्यात आले. 2014 मध्ये दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर या मृत अवस्थेत आढळल्या. त्यासंबंधी अजूनही तपास सुरू आहे.

दिग्विजय सिंह यांनी केले 72 व्या वर्षी लग्न -

काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि टीव्ही न्यूज अ‌ॅंकर अमृता राय यांचे 2015 मध्ये काही फोटो प्रसारमाध्यमात लिक झाले होते. या प्रकरणावेळी दिग्विजय सिंह यांचे वय 71 वर्ष होते, तर अमृता राय या विवाहित असून 40 वर्षांच्या होत्या. दिग्विजय सिंह यांच्याशी लग्न करण्याससाठी अमृता राय यांनी आपल्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. मात्र, हे प्रेम प्रकरण समोर आल्याने दिग्विजय सिंह आणि काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का बसला होता.

काँग्रेस नेते एनडी तिवारी यांनी 88 व्या वर्षी केले लग्न -

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा किस्सा देशात सर्वात जास्त गाजला होता. 2008 मध्ये कोर्टात रोहित तिवारी यांनी एनडी तिवारी हे आपले पिता आहेत, असा दावा केला होता. या दाव्यानंतर कोर्टाने काँग्रेस नेते एनडी तिवारी यांना डीएनए टेस्ट करण्याचे आदेश दिले. डीएनए टेस्टमध्ये एनडी तिवारीच हे रोहित तिवारींचे वडील असल्याचे निष्पन्न झाले. या नंतर एनडी तिवारी यांनी रोहित याला आपला मुलगा मानत त्याच्या आईशी लग्न केले. रोहित यांच्या आई उज्वला सोबत एनडी तिवारी यांचे विवाह बाह्य संबंध होते. या दोघांचेही लग्न झाले आल्याने त्यांनी त्यावेळी लग्न केले नव्हते. मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतर एनडी तिवारी यांनी उज्वला यांच्याशी लग्न केले. त्यावेळी एनडी तिवारी यांचे वय 88 होते, तर उज्वला यांचे वय 77 वर्ष होते.

हेही वाचा - सिंधुदुर्गात गोड्या पाण्यातील मत्स्य क्रांतीतून तरुणांसाठी आत्मनिर्भर रोजगाराची चळवळ

Last Updated : Feb 14, 2021, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details