मुंबई - एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. तर, दिल्लीतील नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो पथकाकडून रिया प्रकरणाचा तपास सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्याशी संबंधित व्यक्तींचा तपास या पथकाडून होत आहे. मात्र, याप्रकरणी केंद्र सरकारच्या तपासावर काँग्रेस नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. एनसीबी पथकाच्या गाडी वापरावरुन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
'त्या' गाडीवर कमळ कशाला? 'एनसीबी' पथकाच्या गाडीवरुन नितीन राऊतांचा सवाल - allegations on Rhea Chakraborty
रिया चक्रवर्तीची चौकशी करायला आलेल्या गाडीवर 'कमळाचे चिन्ह' दिसल्याने सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाचा तपास वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
!['त्या' गाडीवर कमळ कशाला? 'एनसीबी' पथकाच्या गाडीवरुन नितीन राऊतांचा सवाल कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8731651-819-8731651-1599590908485.jpg)
कार
NCB पथकाची गाडी
राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गाडीचा फोटो शेअर करत प्रश्न विचारला आहे की. 'मुंबईत आल्यानंतर या पथकाने जी गाडी वापरली आहे, त्या गाडीच्या नंबर प्लेटवर कमळाचे चिन्ह कशासाठी?' या गाडीचा नंबर MH 46 AP 6566 असून गाडी पनवेल RTO च्या रजिस्ट्रेशनची आहे.
Last Updated : Sep 9, 2020, 3:58 AM IST