महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांसाठी आज सोडत  - MHADA Konkan Mandal

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांची आज सोडत काढण्यात येणार आहे.

MHADA
फाईल फोटो

By

Published : Oct 14, 2021, 2:07 AM IST

मुंबई - कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत आज, १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

८९८४ सदनिकांसाठी आज सोडत -

या सोडतीसाठी कोंकण मंडळ प्रशासन सज्ज झाले असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी यासाठी ढोल-तुतारीच्या निनादात सोडतीचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्हातील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ८९८४ सदनिकांकरिता अर्जदारांकडून ऐतिहासिक प्रतिसाद लाभला असून सुमारे २ लाख ४६ हजार ६५० अर्जदार या सोडतीत सहभागी होत आहेत.

ठाणे येथील संगणकीय सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी स्वतःचे ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती सोबत आणावी. अर्जाची मूळ पावती नसल्यास अर्जदाराला सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नाट्यगृहात मर्यादित अर्जदारांनाच प्रवेश दिला जाणार आहे. https://mhada.ucast.in या लिंकवर क्लिक करून सदर सोडतीचे घरबसल्या वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण (Live Telecast) बघण्याची सुविधा म्हाडातर्फ़े उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडतीचा निकाल आज सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov,in व https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

हेही वाचा -Cruise Drug Case : आर्यनला 'जेल की बेल'?; आज न्यायालय देणार निकाल

ABOUT THE AUTHOR

...view details