महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत; कुणाचं नशीब फळफळणार? - uday samant

वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हाडाची २१७ घरांसाठी सोडत

By

Published : Jun 2, 2019, 7:40 AM IST

मुंबई- म्हाडा प्राधिकरणातील मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २१७ सदनिकांसाठी संगणकिय सोडत आज काढण्यात येणार आहे. आतापर्यत ६६ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीसंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली असून सोडती करता म्हाडा प्रशासन सज्ज झाले आहे.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात 'म्हाडा'चे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळातर्फे ६ मार्च रोजी २१७ सदनिका विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका व मध्यम उत्पन्न गटाकरिता ४७ सदनिकांचा समावेश आहे. सोडतीमध्ये प्राप्त सर्व सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याकरिता १३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याकरिता, ऑनलाईन पेमेंट व आरटीजीएस/एनईएफटी द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी दि. २४ मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली.

म्हाडाची २१७ घरांसाठी सोडत

म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला असून संगणकीय सोडतीचे प्रक्षेपण व्यासपीठावर उभारण्यात आलेल्या भव्य पडद्यावर तसेच मंडपातील तीन एलईडी स्क्रीन्सवर पाहता येणार आहे. सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षायादीवरील अर्जदारांची नावे https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details