महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाप्पा निघाले भारत-पाक सीमेवर; गणरायाची मूर्ती मुंबईहून काश्मीरसाठी रवाना - india pak border Ganeshotsav 2021

भारत-पाक सीमेवर असलेल्या पूंछ जिल्ह्यामध्ये मराठा रेजिमेंटद्वारे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी गणेशाची मूर्तीही मुंबईतूनच जाते. आज ही मूर्ती काश्मीरसाठी रवाना झाली आहे.

By

Published : Sep 6, 2021, 4:52 PM IST

Updated : Sep 6, 2021, 7:55 PM IST

मुंबई - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून तयारी सुरू झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. भारताचे संरक्षण करणारे सैनिकसुद्धा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करतात. भारत-पाक सीमेवर असलेल्या पूंछ जिल्ह्यामध्ये मराठा रेजिमेंटद्वारे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी गणेशाची मूर्तीही मुंबईतूनच जाते. आज(6 सप्टेंबर) भारत-पाक सीमेवर गणरायाची मूर्ती मुंबईहून काश्मीरसाठी रवाना झाला आहे.

बाप्पा निघाले भारत-पाक सीमेवर

हेही वाचा -मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव; वाचा यंदाचे वैशिष्टये

  • गणरायाची मूर्ती मुंबईहून काश्मीरसाठी रवाना -

भारत-पाक सीमेवर असलेल्या पूंछ जिल्ह्यामध्ये मराठा रेजिमेंटद्वारे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी गणेशाची मूर्तीही मुंबईतूनच जात असते. समाजसेविका ईशर शर्मा या गेल्या सहा वर्षापासून मुंबईतूनच गणेश मूर्ती घेऊन पूछ जिल्ह्यामध्ये भारत - पाकिस्तान सीमेवर जात असतात. त्या ठिकाणी दहा दिवस हा गणेश उत्सव सैनिकांसोबत उत्साहात साजरा केला जातो. घाटकोपरमधील सिद्धिविनायक चित्र शाळेतून सकाळी रेल्वेने ही गणेश मूर्ती काश्मीरकडे रवाना झाली आहे. काश्मीरमध्ये ज्याप्रकारे सीमेवर हा गणेशोत्सव साजरा केला जातो, त्याचा देखावाच याठिकाणी निर्माण केला आहे.

  • भारतीय सैनिकांसोबत साजरा केला जातो गणेशोत्सव -

आपले सैनिक बांधव कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य भारताच्या सीमेवर बजावत असतात. अफगाणिस्तानमध्ये सध्याची स्थिती चिंताजनक आहे. ज्या ठिकाणी ही मूर्ती चालली आहे, त्या ठिकाणाहून 600 किलोमीटरवर अफगाणिस्तान आहे. दरम्यान, भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही गणेशोत्सव जल्लोषात साजरा करतो, पूर्ण दहा दिवस हा सण तेथे साजरा करतो, असे ईशर शर्मा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशभक्तांचा भर

Last Updated : Sep 6, 2021, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details