मुंबई- विमान तळाच्याधर्तीवर मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) पेड पार्किंग सुविधा सुरु केली आहे. मात्र, स्थानकांवर प्रवासी सोडायला येणाऱ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा खासगी वाहन चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली अवाजवी पार्किंग दर आकारत असल्याची ( LTT stations parking fee ) धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत प्रवासी आणि सामाजिक संघटनी रेल्वेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही या पार्किंगवाल्याकडून प्रवाशांची ( LTT stations parking fee Loot ) लूट सुरू आहे.
'आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय'-
मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) पेड पार्किंग ( Paid parking service at LTT in Mumbai ) सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांचे खासगी वाहन किंवा रिक्षा, टॅक्सीधारकांनी 5 मिनिटांपेक्षा काही अवधी वाहन उभे केल्यास 50 रुपये दर आकारला जातो. 15 ते 30 मिनिटांसाठी 200 रुपये आकारले जातात. तर, त्यानंतरच्या कालावधीसाठी तास प्रमाणे दर आकारले जात आहेत. पार्किंगसाठी एवढे दर आकारून प्रवासी, रिक्षाचालक, टॅक्सीचालकांची मध्य रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यासमोर कंत्राटदाराकडून लूट ( Parking charges loot in LTT ) केली जात आहे. त्यामुळे 'आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय' अशी अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे.
एलटीटी स्थानकांवर प्रवाशांची लूट हेही वाचा-Ajit Pawar on MH budget : केंद्राचा अर्थसंकल्प पाहून राज्याचा अर्थसंकल्प मांडू - अजित पवार
रेल्वेने दखल घेतली नाही-
विशेष म्हणजे रेल्वे स्थानकांवर पीकअप आणि ड्रॉपसाठीसाठी वाहन चालकांकडून पैसे घेण्यात येत आहे. पाच मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला तर वाहन चालकांकडून ५० रुपये वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा खासगी वाहन चालक हैराण झाले आहेत. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, यावर आतापर्यंत रेल्वेने दखल घेतली नाही.
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, १३८४ नव्या रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू
रेल्वे मंत्र्यांकडे करणार तक्रार -
'अपना पूर्वांचल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कुमार दुबे ( Apana Purvanchal Mahasangh ) यांनी सांगितले, की लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहन चालकांकडून पैसे घेण्यात येत आहे. स्वतःचा माझ्याकडून पैसे घेतले आहे. रिक्षा व टॅक्सीमधील प्रवाशांना चढउतार करायला फक्त ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला की ५० रुपये शुल्क, १५-३० मिनिटांपेक्षा २०० रुपये आणि ३० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीसाठी एक हजार रुपये आकारले जात आहेत. ही एका प्रकारची लूट सुरू आहे. याबाबत मी रीतसर तक्रार रेल्वेकडे केली आहे. एलटीटी स्थानकावरील पार्किंग सुविधा तात्काळ बंद करून प्रवाशांची लूट थांबवावी. अन्यथा मी रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे अपना पूर्वांचल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कुमार दुबे ( Ashok Kumar Dube ) यांनी सांगितले.
हेही वाचा-Nagar Panchayat President Reservation : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, पाहा कुठे कुणाची लॉटरी..
रिक्षा, टॅक्सी चालकांचा व्यवसाय अडचणीत -
एलटीटीवर सुमारे 24 फेऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्याच्या होतात. यातून हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. प्रत्येकाकडे खूप साऱ्या बॅगा, गोण्या आणि इतर सामग्री असते. या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचविण्यासाठी एलटीटीच्या पे अँन्ड पार्किंग भागात रिक्षा, टॅक्सीधारक असतात. प्रवासी बॅगा व सर्व सामग्री घेऊन रिक्षा, टॅक्सीत ठेवतात. मात्र, यासाठी 5 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला तर, वाहनधारकांना 50 रुपये पार्किंगचे भाडे आकारले जाते. त्यामुळे प्रवासी, रिक्षा, टॅक्सी चालकांना येऊन व्यवसाय करणे अडचणीचे झाल्याची प्रतिक्रिया टॅक्सी चालकांकडून देण्यात आली आहे.