महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खूशखबर.. रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्वीप्रमाणे धावणार.. तिकीट दरही 30 टक्क्यांनी होणार स्वस्त

कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे रेल्वे रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार असून तिकीट दरही पूर्ववत करण्यात आल्यामुळे रेल्वे प्रवास आता 30 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे.

train services
train services

By

Published : Nov 14, 2021, 6:37 PM IST

मुंबई - कोरोनाकाळामध्ये विशेष रेल्वेसेवा सुरू केली होती. पण आता कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे रेल्वे रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार असून तिकीट दरही पूर्ववत करण्यात आल्यामुळे रेल्वे प्रवास आता 30 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. यामुळे आता रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तिकीट दरात तब्बल ३० टक्क्यांनी घट -

गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च 2020 पासून देशभरातील रेल्वे प्रवासी गाडया बंद करण्यात आलेल्या होत्या. मात्र, नंतर हळूहळू बहुतांश रेल्वे गाड्या कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या होत्या. मात्र, नियमित गाड्याऐवजी मेल-एक्स्प्रेसच्या नंबरमध्ये बदल करून विशेष तिकीट दराने या गाड्या आज देशभरात धावत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाऊनमुळे आगोदरच कंबरडे मोडले होते. यात प्रत्येक बाबींचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. सामान्य नागरिकांना परवडणारे रेल्वेचे तिकीटही विशेष गाड्यांच्या नावावर वाढविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासना विरोधात प्रचंड नाराजी होती. मात्र आता कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहे. मेल एक्स्प्रेसच्या तिकीट दरात तब्बल ३० टक्क्यांनी घट होणार आहे. अर्थात रेल्वे स्वस्ताईचा हा निर्णय कधीपासून अमलात येणार याची तारीख रेल्वेने जाहीर केलेली नाही.

प्रवाशांना मिळणार दिलासा -

रेल्वेच्या या निर्णयानुसार १ हजार ७०० पेक्षा अधिक मेल-एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. रेल्वे प्रवास करताना कोरोनाचे सर्व नियम लागू असतील. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून रेल्वेसेवा बंद होती. पण देशातील नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी कोरोनाकाळामध्ये विशेष रेल्वेसेवा सुरू केली होती. पण आता कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासावरील निर्बंधही आता उठवले आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details