- माढ्याचा तिढा सुटला, भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता माढा लोकसभेचा सामना राष्ट्रवादीच्या संजय शिंदे विरुद्ध रणजिंतसिंह निंबाळकर यांच्यात होणार आहे. वाचा सविस्तर
- आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उत्पन्नात पाचपटीने वाढ; उमेदवारी अर्जात खुलासा
औरंगाबाद - कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उत्पन्नामध्ये ५ वर्षात पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना हा खुलासा झाला. आमदारकीच्या मानधनामुळे हे उत्पन्न वाढले असल्याचे त्यांनी अर्जाच्या शपथपत्रात नमूद केले आहे. वाचा सविस्तर
- भाजपवर कायम तोंडसुख घेणारे उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत जाणार
मुंबई - भाजप- शिवसेना युतीत घनिष्ट संबंध असल्याचे कार्यकर्त्यांना दर्शवण्यासाठी खटाटोप करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. शाह यांनी ठाकरे यांना काल दूरध्वनी वरून अहमदाबादला येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत ठाकरे यांनी अहमदाबादला जाण्याचे माण्य केले आहे. उद्या सकाळी ९ वाजता होणाऱ्या रोड- शोमध्येही ठाकरे सहभागी होतील. वाचा सविस्तर
- सुजय विखेंनी घेतली खासदार दिलीप गांधींची भेट, सुवेंद्र गांधींची मात्र अनुपस्थिती
अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले डॉक्टर सुजय विखे यांनी आज सकाळी विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विद्यमान खासदार असताना उमेदवारी न मिळाल्याने गांधी हे नाराज असून त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. या परिस्थितीत नाराज असलेल्या गांधींची समजूत काढण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती करण्यासाठी सुजय विखे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वाचा सविस्तर
- उमेदवारी अर्ज भरताना राजू शेट्टी सोबत योगेंद्र यादव; काय आहे संबंध?
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. गुरूवारपासूनच नामांकनासाठी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटेचे नेते राजू शेट्टी यांनी समर्थकांच्या मोठ्या गर्दीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर
- काँग्रेसने माणिकराव गावितांना डावलले; गावित पिता-पुत्र बंडखोरीच्या तयारीत