महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देश चालवण्यासाठी ५६ पक्ष नाहीतर ५६ इंचाची छाती लागते, फडणवीसांची महाआघाडीवर टीका -  कोल्हापूर

राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा वाचा थोडक्यात

मतकंदन

By

Published : Mar 24, 2019, 4:26 PM IST

Updated : Mar 24, 2019, 11:48 PM IST

  • देश चालवण्यासाठी ५६ पक्ष नाहीतर ५६ इंचाची छाती लागते, फडणवीसांची महाआघाडीवर टीका

कोल्हापूर - सरकार चालवण्यासाठी ५६ पक्ष नाहीतर ५६ इंचाची छाती लागते अशी टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युतीच्या पहिल्याच प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. काही लोकांनी ५६ पक्ष एकत्र आणलेत पण त्यांची नोंदणी तरी आहे का? ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही. त्यासाठी मोदींसारखा नेता हवा, असे ते यावेळी म्हणाले.

  • महाराष्ट्र खड्ड्यात घालण्यात शरद पवारांनी आयुष्य घातलं, उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापूर - महाराष्ट्र खड्ड्यात घालण्यात ज्यांनी आयुष्य घातलं, अशी माणसांना आपल्या दारात नको. राष्ट्रवादीला मत देणार असाल तर अजित पवार धरणं कशी भरणार होते ते आठवा, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आम्हाला सत्ता गोरगरिबांच्या कल्याणासाठी हवी आहे, असेही ते महायुतीच्या कोल्हापूरातल्या पहिल्या प्रचार सभेत बोलले.

  • काँग्रेसनं चंद्रपूराचा उमेदवार बदलला, शिवसेनेतून आलेल्यासुरेश धानोरकरांना दिली संधी

मुंबई - काँग्रेसने चंद्रपुरातून अखेर सुरेश धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. यापूर्वी विनायक बांगडे यांचे नाव काँग्रेसने जाहीर केले होते. या जागेवरुन बराच वाद झाला होता. काँग्रेसने एकूण ४ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहे. अकोलामधून हिदायत पटेल, रामटेक येथून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे तसेच चंद्रपुरातून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

  • सामन्यानंतरच सुशीलकुमार शिंदेंना उत्तर मिळेल - प्रकाश आंबेडकर

लातूर - वंचित बहुजन आघाडीवर माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी पहिल्याच प्रचार सभेत टीका केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया न देता सामना रंगणार आणि त्यातूनच त्यांना उत्तर मिळेल असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लातुरात प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच अद्यापही अनेक पर्याय समोर असल्याचे ते म्हणाले.

  • अहमदनगर दक्षिणमध्ये राजकीय घडामोडींना वेग; गांधी-थोरातांच्या भूमिका आज होणार स्पष्ट

अहमदनगर - लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजचा दिवस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी राजकीय भूमिकावार ठरणार आहे. आज एकीकडे युती-आघाडीने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून घटकपक्ष, नेते-कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे भाजप विद्यमान खासदार दिलीप गांधी समर्थकांनीही निष्ठावंताचा एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात खा. गांधी आणि त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. वाचा सविस्तर

  • काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भाजप प्रवेश करणार

मुंबई : लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. वाचा सविस्तर

  • कोल्हापुरात युतीच्या प्रचार आज फुटणार नारळ

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज (रविवार) कोल्हापुरात फुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार असून, याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास अडीच लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

  • जय सिद्धेश्वर ठरतील का सोलापूरचे 'योगी'? भाजप राबवू पाहतोय युपी पॅटर्न

सोलापूर - भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लिंगायत धर्मगुरू डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत भाजपने देशभरात अनेक अध्यात्मिक धर्मगुरुंना संसदेत पाठवले आहे. उत्तर प्रदेशात तर योगी आदित्यनाथ थेट मुख्यमंत्रीपदी बसले आहेत. सोलापुरात देखील भाजप हाच युपी पॅटर्न राबवत असल्याचे बोलले जात आहे. हा पॅटर्न यशस्वी होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल.वाचा सविस्तर

  • तिढा सांगलीचा : सोशल मीडियावर एकच प्रश्न, झालं का फायनल?

सांगली - लोकसभेच्या काँगेस उमेदवारीच्या वादानंतर निर्माण झालेला जागेचा प्रश्न मिटता-मिटेना. स्वाभिमानाच्या वाट्याला जागा जाणार की? काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या उत्सुकतेपोटी सोशल मीडियावर फक्त 'फायनल झालं का' अशी चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीपासून भाजपच्या नव्हे तर सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला काँग्रेसला जागा मिळणार की, स्वाभिमानीला? आणि मिळाल्यास उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.वाचा सविस्तर

  • राज्यातील सर्वात मोठी माथाडी कामगार संघटना फुटीच्या वाटेवर?

मुंबई - माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी नवी मुंबईत दरवर्षी प्रमाणे माथाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या मेळाव्याला शनिवारी एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्यांना बोलाविण्यात आले नाही. दरवर्षी शरद पवार किंवा मुख्यमंत्र्यांना आवर्जून बोलावले जायचे. पण, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वारंवार पक्ष बदलामुळे कोणत्या नेत्यांना बोलवायचे याबाबत गोची झाल्याने प्रथमच माथाडी मेळाव्याला कोणीही मोठे नेते उपस्थित नव्हते.वाचा सविस्तर

  • वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी' टीम; अजित पवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

मुंबई - देशाच्या हितासाठी आम्ही काही पक्षांना महाआघाडीत सामावून घेऊ इच्छित होता. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र, तथ्यहीन कारणे देऊन आघाडी होऊ नये, यासाठी भाजपची बी-टीम कार्यरत होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता लगावला. ते आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.वाचा सविस्तर

Last Updated : Mar 24, 2019, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details