मुंबई - भाजप कार्यालयात मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील कार्यकर्त्यांना मार्गदशनासाठी आणि भाजप मुंबई अध्यक्ष पदाच्या बदलाकरता बैठक पार पडणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना बदलण्याची मागणी या बैठकीत आमदार आणि नगरसेवक करणार आहेत. मंगल प्रभात लोढा यांनी पदभार स्वीकारल्या पासून आजपर्यंत संत गतीने मुंबई भाजपचा कार्यभार चालला आहे. म्हणून हे सर्व भाजप पदाधिकारी ही मागणी करणार आहेत.
मंगलप्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष पदावरून उचलबांगडी? - News about BJP Mumbai president's post
भाजप कार्यालयात मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अध्यक्ष बदलाकरता बैठक होणार आहे. मुंबई भाजपच्या अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना बदलण्याची मागणी आमदार आणि नगरसेवक करणार आहेत.
मंगलप्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता?
आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत त्यामुळे या निवडणुकांमध्ये आक्रमक पद्धतीने भाजप कार्य करावे यासाठी आशिष शेलार यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची काही नगरसेवक आणि आमदारांची मागणी आहे. आज संध्याकाळी सहा वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. मुंबईचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.