मुंबई - राज्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन राज्य सरकारने घोषित केला आहे. त्यामुळे राज्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर देखील झाला आहे. या मार्गावर नेहमी वर्दळ असते, मात्र आज सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
सायन-पनवेल महामार्ग हा गजबजलेला महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग पुढे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला गेला आहे, त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र लॉकडाऊन लागल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अगदी तुरळक वाहतूक या रस्त्यावर आज पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून फक्त अत्यावश्यक सेवेमधील गाड्या जाताना दिसत आहेत.