महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Cases Increased : मुंबईत लॉकडाऊनची धास्ती? पाहा काय आहे परिस्थिती... - Mumbai railway station news

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत ( Mumbai Corona Cases Increased ) आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची हालचाल सुरु असल्याचे वृत्त ( Mumbai Lockdown News ) आहे. याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

Mumbai Corona Cases Increased
mumbai railway station

By

Published : Jan 7, 2022, 10:39 PM IST

मुंबई - शहरात कोरोना रुग्णांची संख्या ( Mumbai Corona Cases Increased ) वाढत आहे. गुरुवारी 24 तासांत 20 हजारांहून अधिक ( Mumbai Reported 20 Thousand Corona Cases ) रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या ( Mumbai Lockdown News ) दिशेने सुरु असल्याच्या अफवा उठल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर परप्रांतीयांनी आपल्या कुटुंबासह गावाची वाटचाल धरल्याचे वृत्त प्रसारित झाले. त्याबाबात ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

लॉकडाउनच्या घोषणा झाली नाही -

मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर लॉकडाऊन लावले गेले. तेव्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होती. लाखो परप्रांतीय मजूरांनी मिळेल त्या मार्गाने आपले घर गाठले. यादरम्यान, अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तदनंतर शासनाने श्रमिक ट्रेन सुरू केली. त्यामाध्यमातून लाखो मजुर त्यांच्या घरापर्यंत सुखरुप घरी गेले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच गावी गेलेले मजुर मुंबईत परतले. मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. एकाच दिवशी 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकाने कडक निर्बंध लावले आहे. परंतु, अद्यापही लॉकडाऊनची घोषणा झाली नाही.

आढावा घेताना प्रतिनीधी

अफवांवर विश्वास ठेवून नका -

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले की, "लोकमान्य टिळक टर्मिनसवर गुरुवारी रात्री कशाही प्रकारची गर्दी अथवा लाठीचार्ज झाला नाही. त्याबाबतचे वृत्त चुकीचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांना न विचारता असे वृत्त देणे निरर्थक आहे. सध्या रेल्वे स्थानकांवर बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी आणि लसीकरण प्रमाणपत्र तपासले जात आहे. रेल्वे स्थानकांवर गर्दी होणार नाही याची काजळी घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना स्षप्ट केले."

दररोज मुंबईत २०० रेल्वे गाड्या -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वांद्रे टर्मिनसल या तीन स्थानकातून दररोज २०० लांबपल्याचा गाड्या येजा करतात. त्यात बाहेर राज्यातून येणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी आहे. बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग, लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाते. लसीकरण प्रमाणपत्र नसणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाते. तसेच, स्थानकांवर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती, रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा -Mayor violated COVID 19 rules: ठाणे महापौरांकडूनच कोरोनाचे नियम पायदळी! गर्दीत उद्घाटन सोहळा

ABOUT THE AUTHOR

...view details