मुंबई -शहरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची दखल सातासमुद्रापार घेतली जाते. या गणेशोत्सवात होणाऱ्या आर्थिक उलाढालीमुळे अनेकांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात वाजणारे वाद्य, ऑर्केस्ट्राचा आवाज यंदा ऐकायला मिळत नाही. या कलाकारांवर उपासमारीची वेळ आहे. ऑर्केस्ट्रा कलाकार विजय मारू आणि बिपिन शिर्के यांनी रोजगार मिळावा, यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय.
ईटीव्ही भारत विशेष: ऑर्केस्ट्रा बंद झाल्याने कलाकारांवर भाजीपाला विकण्याची वेळ मागील वर्षी गणेशोत्सवात आम्हाला बसायला देखील वेळ नव्हता. आता बसून माश्या मारायची वेळ आल्याची खंत या कलाकारांनी व्यक्त केली. आता येणाऱ्या नवरात्र उत्सवात तरी तरी आमचे कार्यक्रम सुरू होतील, अशी आशा या कलाकारांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सव सुरू होऊन पाच दिवस उलटले आहेत. मात्र जो उत्साह मुंबईकर गेल्या अनेक वर्षापासून अनुभवत आहेत, तो यंदा दिसत नाही. गणेशोत्सवाशी अनेक व्यवसाय जोडले आहे. गणेशोत्सव आला की संगीत हे आलंच. ऑर्केस्ट्रा कलाकारांना या दिवसात मोठी मागणी असते. डीजे वर आलेली आलेली बंदी यानंतर ऑर्केस्ट्रा कलाकारांना मोठी मागणी मागील वर्षी दिसून आली होती होती. तसेच या कलाकारांची मुख्य महिने असलेले चार महिने हे वाया गेले आहेत. आता नवरात्र उत्सवात तरी आमचे ऑर्केस्ट्रा सुरू होईल की नाही ही याकडे या कलाकारांचे लक्ष लागले आहे आहे.
कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी ऑर्केस्ट्रा कलाकार विजय मारू यांनी कांदा, बटाटा आणि हार विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या बारा वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करत आहे. अनेक नामांकित कलाकारांसह त्यांनी काम केलं आहे. कोरोनामुळे कलाकारांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवात आम्हाला थोडाही वेळ असतो. मात्र यंदा सर्वत्र शांतता आहे. कुटुंबावर आलेले आर्थिक संकट कसे पेलायचे, असा प्रश्न आमच्या समोर आहे.
मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी मिळून एक छोटा तात्पुरता व्यवसाय सुरू केला आहे. नवरात्र उत्सवात आमची रोजीरोटी सुरू व्हावी, अशी प्रार्थना मी गणपती बाप्पा कडे करतो कडे करतो असे मारू यांनी सांगितले.
गेली तीस वर्ष या क्षेत्रात काम केले आहे. अनेक अडचणींचे दिवस मी पाहिले. परंतु एवढे वाईट दिवस पाहिले नव्हते. जे नवीन कलाकार आहेत कलाकार आहेत त्यांची खूप हाल होत आहे. कारण आम्हा कलाकारांना या कलेशिवाय दुसरं काही येत नाही येत नाही. सरकारकडे आम्ही काही मागणी नाही आहे. फक्त नवरात्र उत्सवात तरी ऑर्केस्ट्रा आणि संगीत दिसावे, हीच मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत, असे बिपीन शिर्के यांनी सांगितले.