महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सीएसटीएम ते वांद्रे या मार्गावर लोकल सुरू, प्रवाशांना दिलासा - CSTM to Bandra Local

हार्बर मार्गावरील सीएसटीएम ते वांद्रे या मार्गावर लोकल सुरू असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल रेल्वे

By

Published : Aug 4, 2019, 8:06 PM IST

मुंबई - शहर आणि परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक मार्गावरील लोकल सेवा या ठप्प झाली आहे. मात्र, आज (रविवारी) सकाळपासून हार्बर मार्गावरील सीएसटीएम ते वांद्रे या मार्गावर लोकल सुरू असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीएसटीएम ते वांद्रे या मार्गावर लोकल सुरू

हार्बर मार्गावर वांद्रेपर्यंत जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटांच्या अंतराने सोडण्यात येत आहेत. या मार्गावर कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याने ही सेवा सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे चुनाभट्टी व परिसरात अद्यापही पावसाचे भरलेले पाणी ओसरले नसल्याने त्यापुढील मार्गावर लोकलसेवा सुरू करण्यास अडचणी येत असल्याने तो मार्ग बंद असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details