महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर रेल्वे प्रशासन सतर्क; 'लोकल'च्या सुरक्षेत होणार वाढ! - लोकल रेल्वे सुरक्षा बातमी

आज रेल्वे सुरक्षा बलासह रेल्वे पोलीस व इतर सुरक्षा विभागामध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत रेल्वे परिसरात सुरक्षा वाढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली असून, सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

railway police
रेल्वे पोलीस फाईल फोटो

By

Published : Sep 15, 2021, 8:32 PM IST

मुंबई -दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. तसेच उल्हासनगर स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर आज रेल्वे सुरक्षा बलासह रेल्वे पोलीस व इतर सुरक्षा विभागामध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत रेल्वे परिसरात सुरक्षा वाढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली असून, सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • संशयित हालचालींवर रेल्वेचे असणार लक्ष -

दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची लोकल असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत दहशतवाद्यांनी लोकल ट्रेनची रेकी केली असल्याची माहिती मिळत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका नराधमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीवर आज लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल व इतर सुरक्षा विभाग यांच्यामध्ये बैठक पार पडली. यात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती

रेल्वे परिसरात जागोजागी तपासणी करण्यात येत आहे. श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाद्वारे देखील पाहणी केली जाणार आहे. संशयित हालचाली दिसल्यास माहिती देण्याच्या सूचना स्थानकांवरील हमाल, बूट पॉलिशवाल्यांना दिल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • महिला सुरक्षेमध्ये वाढ करण्यावर चर्चा -

रेल्वे परिसरात वारंवार महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे गस्तीचे प्रमाण वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून इतर कॅमेरे अद्ययावत करणे यावर चर्चा झाली. महापालिका आणि रेल्वे हद्दीच्या भागात देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी भर दिला जाणार आहे. रेल्वेच्या असुरक्षित इमारती जमीनदोस्त करण्यावर चर्चा झाली आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा -राज कुंद्रा प्रकरण : गुन्हे शाखेने दीड हजार पानांचे पुरवणी दोषारोपपत्र केले न्यायालयात सादर

ABOUT THE AUTHOR

...view details