मुंबई -मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची लोकल आज सकाळीच खोळंबली आहे. दहिसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान ओव्हरहे़ड वायर तुटल्याने लोकल 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे.
Local Trains Running Late : ओव्हरहेड वायर तुटली; वेस्टर्न लाईनची लोकल खोळंबली
मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची लोकल आज सकाळीच खोळंबली आहे. दहिसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान ओव्हरहे़ड वायर तुटल्याने लोकल 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत.
लोकल
वेस्टर्न लाईनवर दहिसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान ओव्हरहे़ड वायर आज सकाळीच तुटली आहे. त्यामुळे दहिसर स्थानकापुढे एकही लोकल गेलेली नाही. अनेक लोकल या दहिसर स्थानकातच अडकून आहेत. यामुळे विविध स्थानकांमध्ये चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक लोकल या 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत