महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मध्य रेल्वे मार्गावर मशीन घसरल्याने दुर्घटना; १ ठार तर २ कामगार जखमी

बुधवारी पहाटे २.३० ते पहाटे ५ पर्यंत खडी कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी खडी टाकणारी मशीन रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळेच मध्य अंबरनाथ ते बदलापूर दरम्यानची रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी कर्जत कडून थेट मुंबईला जाणाऱ्या गाड्या नसल्याने चाकरमान्यांना प्रवासात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

central railway
मध्य रेल्वे मार्गावर मशीन घसरल्याने दुर्घटना

By

Published : Jan 27, 2021, 8:59 AM IST

Updated : Jan 27, 2021, 10:34 AM IST

मुंबई- कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमध्ये रेल्वेने लोकलसेवा बंद केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. अशातच मध्य रेल्वेच्या मार्गावर रुळ दुरुस्ती करणारे मशीन घसरून दुर्घटना घडली आहे. यामुळे या मार्गावरील अंबरनाथ ते बेदलापूर दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मशीन घसरल्याने दुर्घटना

रेल्वे मंत्रालयाचे कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. तसचे लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील रेल्वे सेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र, सध्य स्थितीतही ऐन कार्यालयीन वेळीच अंबरनाथ-कर्जतदरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मशीन घसरल्याने दुर्घटना;

एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू-

अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान रुळाच्या मध्ये खडी टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मंगळवारी रात्री खडी टाकणारी मशीन रुळावरून घसरल्याची घटना घडली. यामध्ये दोन मजूर जखमी झाले असून, एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला त्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी कर्जत कडून थेट मुंबईला जाणाऱ्या गाड्या नसल्याने चाकरमान्यांना प्रवासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्य स्थितीत मुंबई ते अंबरनाथ बदलापूर ते कर्जत वाहतूक सुरू आहे. मशिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती कल्याण जीआरपीने देण्यात आली आहे. तसेच या खोळांब्यांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर मशीन घसरल्याने दुर्घटना

सर्वसामान्यासाठी लवकरच परवानगी-

कमी गर्दीच्या वेळेत सरसकट सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार सामान्य लोकांना सकाळी सात वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळू शकते. या काळात रेल्वे सेवेवरचा ताण कमी असतो. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका तुलनेत कमी आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून या प्रस्तावाची चाचपणी सुरू असून, लवकरच मुंबईतील लोकल ट्रेनचे नवे वेळापत्रक जाहीर होऊ शकते.

Last Updated : Jan 27, 2021, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details