मुंबई - मुंबई व शहरात पडलेल्या पावसामुळे बुधवारी काही ठिकाणी रुळावर पाणी साचले होते. यामुळे लोकलची सीएसएमटी ते पनवेल व सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आज गुरुवारी ही सेवा पूर्ववत झाल्याची माहिती आहे.
मुंबईची लाईफलाईन पूर्ववत; नागरिकांना दिलासा
जोरदार पावसामुळे रुळावर पाणी साचल्याने शहरातील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. ती सेवा आज सकाळपासून सुरु झाल्याची माहिती आहे.
शहरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे लोकलची सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र, आज मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे, यामुळे बुधवारी रात्री अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज सकाळी 4 वाजता मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे वाहतूक सुरू करण्यात आली. हार्बर मार्गावर आज पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी सीएसएमटी ते अंधेरी आणि पनवेल लोकल सेवा सुरू करण्यात आली. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते अंधेरी व चर्चगेट ते विरार लोकल सेवा रात्री उशिरा सुरु करण्यात आल्याची माहिती आहे.