महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई : कारवाई करणाऱ्या एनसीबी पथकाला धक्काबुक्की; तीन जणांना १४ दिवसांची कोठडी - NCB action on Drug peddler

अमली पदार्थ तस्करीबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल बिरोजा गोरेगाव परिसरात कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांबरोबर काहीजणांनी वाद केला.

एनसीबी
एनसीबी

By

Published : Nov 23, 2020, 2:04 PM IST

Updated : Nov 23, 2020, 3:34 PM IST

मुंबई - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या पथकाबरोबर बाचाबाची व धक्काबुक्की करणे तीन जणांचा भोवले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विपुल आगरे , युसूफ शेख, अब्दुल अमिन अशी कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

अमली पदार्थ तस्करीबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल बिरोजा गोरेगाव परिसरात कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांबरोबर तिघा जणांनी बाचाबाची केली. या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल दोन कर्मचारी हे किरकोळ जखमी झाल्याची चर्चा होती. मात्र, विभागाकडे विचारणा केली असता कुठलीही मारहाण झाली नसल्याचे सांगण्यात आले. कारवाईदरम्यान शाब्दिक चकमकी उडाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या संदर्भात सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या 3 जणांच्या विरोधात कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा-अमली पदार्थ प्रकरण : घरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन आहे - अर्जुन रामपाल

एनसीबीकडून कारवाईंचा धडाका सुरू-
एनसीबीने अमली पदार्थ प्रकरणात अडकलेल्या अनेक सेलिब्रिटींची चौकशी सुरू केली आहे. शनिवारी मुंबईतील भारती हिच्या घरावर एनसीबीने छापा टाकला. यावेळी तेथून गांजा जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान भारतीसिंहने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली. यानंतर हर्ष लिंबाचियालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली. कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्षला फोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भारती आणि हर्ष यांच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे.

हेही वाचा-भारती सिंह व पती हर्ष यांना जामिन; 14 दिवसांची झाली होती न्यायालयीन कोठडी

Last Updated : Nov 23, 2020, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details