मुंबई -देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांनी गर्दी केली. यामुळे पुढील तीन आठवडे महत्त्वाचे असल्याने पालिकेकडून योग्य अशी काळजी घेतली जात आहे. तीन आठवड्यात किती रुग्ण संख्या वाढते याचा आढावा घेऊन सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. यामुळे १५ डिसेंबरपर्यंत तरी सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंदच असणार आहेत.
तीन आठवडे लक्ष ठेवणार -
जुलै अखेरपर्यंत आटोक्यात आलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ऑगस्टनंतर पुन्हा वाढू लागला होता. मात्र मुंबईकरांची साथ व आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजना यामुळे पुन्हा कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मात्र दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला असून, दिल्लीतील परिस्थिती पाहता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील तीन आठवडे कोरोनाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसून आले तर सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सक्रिय रुग्णांची संख्या घटली -