महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Local body elections : पुढील निवडणुकाही महाविकास आघाडी म्हणूनच लढू- जयंत पाटील - ED notice to Sanjay Raut

महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी ( Legislative Assembly ) आमचा एकच उमेदवार असणार आहे असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी दिले आहेत. पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. तसेच स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत ( Local body elections ) जिथे-जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु असे पाटील म्हणाले.

NCP State President Jayant Patil
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

By

Published : Jul 1, 2022, 6:31 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी ( Legislative Assembly ) आमचा एकच उमेदवार असणार आहे असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी दिले आहेत. पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. तसेच स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत ( Local body elections ) जिथे-जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु असे पाटील म्हणाले.

Jayant Patil : पुढील निवडणुकाही महाविकास आघाडी म्हणूनच लढू- जयंत पाटील

पवारांना आयकर विभागाची नोटीस -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांना आयकर विभागाची ( Income Tax Department ) नोटीस आल्याचे कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कळले. मागच्या चार निवडणुकीत पवारसाहेबांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती मागविण्यात आली आहे. पवारसाहेबांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना मिळाले असती. परंतु जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरु असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

नेत्यांची दिवसभर चौकशी करून रात्री अटक होते -संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीच्या शेवटी ईडीचे दिल्लीतील अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावे लागेल. कारण याआधी आमचे देखील नेते दिवसा चौकशीला गेल्यानंतर त्यांची रात्रीपर्यंत चौकशी चालली होती. रात्री उशीरा त्यांच्या अटकेच्या बातम्या येतात. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा आपण करुयात असेही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा -CM On Farmer : शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details