स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनावर अवलंबून -वडेट्टीवार - Local body elections depend on corona
कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
वाढता कोरोना सरकारची डोकेदुखी - राज्यात कोरोनाचे रुग्ण डोके वर काढू लागले आहेत. वाढती रुग्णसंख्या राज्य सरकारची डोकेदुखी ठरू लागली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट आहे. पुढचे आठ ते दहा दिवस रुग्णसंख्येत वाढ सुरू राहिल्यास निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाईल. या निवडणुकांची घोषणाही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा कालावधी अधिक असला तरी, काही परिस्थिती ओढवली तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करावी लागेल. तसेच निवडणुका टाळता येतील का, याबाबत विचार करावा लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
प्रचाराला जास्त वेळ मिळणार - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रभागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक पुढे गेल्यास मतदारांपर्यंत पोहचण्यास उमेदवारांना अवधी मिळणार आहे. कोरोनामुळे निर्बंध लागल्यास उमेदवारांची मोठी अडचण होणार आहे.