मुंबई - रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप केले होते. पोलीस बदल्यांमध्ये रॅकेट राज्यात चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलीस बदल्या संदर्भात एसीएसची कमिटी काम करत असते त्यानुसार बदल्या होत असतात, असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिले आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल - Mumbai Police Commissioner Parambir Singh
19:15 March 26
पोलीस बदल्यांसंदर्भात एसीएसची कमिटी काम करते - नवाब मलिक
18:13 March 26
लोकांना गोंधळात टाकण्याचा भाजपचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड
मुंबई -काही लोकं प्रसारमाध्यमांसमोर येऊन खोटं पसरवत आहेत. मनसुख हिरेन प्रकरणातील रुमाल पोस्टमार्टमवेळी आणले नव्हते, ते पुरावे म्हणून पोलिसात जमा केले जातात. लोकांना केवळ गोंधळात टाकण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. यात काही सत्य नाही, फक्त कहाण्या सांगून आपलं व्यक्तीक फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदते सांगितले.
17:20 March 26
फोन टॅपिंग प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल
मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे राज्य गुप्त वार्ता विभाग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कलम 30 भारतीय टेलिग्राफ 1885 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 43 ब, 66 सह the official secret act 1923 च्या कलम 5 अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर विभागाकडून केला जात आहे.
15:17 March 26
'एटीएस'च्या तपासात राज्य सरकारमधील मंत्री हस्तक्षेप करतायेत - आशिष शेलार
मुंबई - मनसुख हिरेन यांच्या मृत्युचा तपास हा महाराष्ट्र एटीएस करत आहे. पण या संपूर्ण एटीएसच्या तपासात राज्य सरकारमधील काही मंत्री आणि नेते हे हस्तक्षेप करत आहेत, असा आरोप भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत लावला आहे. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर गंभीर आरोप लावत या सरकारमधील काही मंत्री हे सचिन वाझे याच्या पाठीशी आहेत आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासात हस्तक्षेप करत आहेत. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचं काम सुरू आहे. ही खूप गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आशिष शेलार यांनी या सरकारवर लावले आहेत.
13:55 March 26
हिरेन यांची हत्या कोणी केली आणि अंबानीच्या घराबाहेर स्फोटके कोणी ठेवली तपासणे गरजेचे :
अंबानींच्या घरासमोर कोणी स्फोटके ठेवली तसेच मनसुख हिरेन यांची हत्या कोणी केली हे तपासणे गरजेचे आहे. हा तपास भरकटून देण्यासाठी विरोधी पक्षाकडून सर्वकाही सुरू आहे. मात्र एटीएस ने खरा तपास केला असता तर खरे मारेकरी आणि याच्या मागे कोण आहे हे समोर आले असते असेही मुश्रीफांनी म्हंटले आहे.
13:52 March 26
फडणवीस यांनी थयथयाट थांबवावा -मुश्रीफ
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी एक अहवाल घेऊन पत्रकार परिषद भरवली होती. तेव्हा अहवाल घेऊन दिल्लीला चाललो आहे सांगत गृहसचिवांना तो दिला. मात्र अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही हे सिद्ध झाले आहे. त्यानंतर देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केल्याने माफी मागितली पाहिजे. लूज बॉल आला तर सीमेपार टोला देतो असे फडणवीस म्हटले होते. मात्र त्यांचा एकही बॉल सीमेपार गेला नाहीये.त्यांचा हा सुरू असलेला थयथयाट थांबवावा असेही मुश्रीफांनी म्हंटले आहे.
13:48 March 26
सिडीआर जप्त करून ते तपासणे गरजेचे - हसन मुश्रीफ
सीताराम कुंटे यांना मिळालेल्या फोन टॅपिंग ची परवानगीचा रश्मी शुक्ला यांनी गैरवापर केला. त्यांनी थेट आमदारांचेच फोन टॅप केले आहेत. 24 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत या कालावधीतील शुक्ला यांच्या फोनचे सिडीआर जप्त करून त्यांचे अपक्ष आमदारांसोबत झालेले संभाषण तपासणे गरजेचे आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
13:24 March 26
फोन टॅपिंग प्रकरणात भाजप तोंडघशी पडले आहे. सरकार अस्थिर करण्याचे त्यांचे गेल्या दीड वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यांना कळून चुकले आहे की, सरकार पाडता येणार नाही. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर अजून धक्कादायक गोष्टी समोर येतील. आणि भाजपचा धक्कादायक चेहरा उघडकीस येईल अशी प्रतिक्रिया मुंबई कॉंग्रेसाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली.
12:19 March 26
सीतीराम कुंटे हे चांगले अधिकारी असून, त्यांचा अहवाल वाचल्यास वस्तुस्थिती समजेल. या प्रकरणात दोषी कोणीही असले तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नाही अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या बदल्या कमिटीने के्ल्या असून त्यात भ्रष्टाचाराचा काही संबंध नाही, असेही मत त्यांनी रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरणात व्यक्त केले.
11:28 March 26
मंत्री असले तरीही मनसुख हिरेन प्रकरणी मुश्रीफ यांचा अभ्यास अत्यंत कच्चा असल्याचाही टोला शेलार यांनी लगावला आहे.
11:25 March 26
आशिष शेलार यांनी कुंटेंच्या अहवालाला "नेरोलॅक पेंट" ची उपमा दिली आहे. आपली काळी बाजू झाकण्यासाठी पांढरा रंग मारलेला कुंटेंचा अहवाल असल्याचेही आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. या प्रकरणी मी एनएआयला पत्र दिले असून सर्व मंत्री तसेच अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी असेही त्यांनी यावेळेस नमूद केले.
11:14 March 26
मृतदेहाची डायटम टेस्ट का केली ती करणे गरजेचे होते का असा सवालही त्यांनी यावेळेस विचारला. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाची डायटम टेस्ट केली असता, या टेस्टसोबत छेडछाड करण्यात आली असल्याचा आरोप शेलारांनी केला आहे.
11:07 March 26
मनसुख हिरेन यांच्या हत्येची केस राज्य सरकारला स्व:ताकडे का ठेवायची होती असेही प्रश्न त्यांनी यावेळेस पत्रकार परिषदेत विचारले आहेत. राज्य सरकारला मनसुख हिरेनचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
10:43 March 26
वाझेला पोलीस खात्यात व्हायचे होते सुपर कॉप
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली. याप्रकरणी एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझेला अटक केली. सचिन वाझेला 17 वर्षानंतर मुंबई पोलीस खात्यात पुन्हा सामावून घेण्यात आले. यानंतर पोलिस खात्यात वाझेला आपलं वजन वाढवायचे होते. शिवाय रातोरात सुपर कॉप बनायचे होते. त्यामुळे मी स्वतः अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओत जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवले होते, अशी कबुली सचिन वाझेने दिली आहे. याचा खुलासा एनआयएने केला आहे.
10:21 March 26
रश्मी शुक्ला अनेक आमदारांच्या संपर्कात होत्या - मंत्री हसन मुश्रीफ
10:18 March 26
एवढे फोन टॅप करूनही सरकार सत्तेत आले - संजय राऊत
10:17 March 26
रश्मी शुक्ला यांनी सरकार येऊ नये म्हणून आमदारांना धमक्या दिल्या - संजय राऊत
10:16 March 26
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्या भूमिका निभावणाऱ्यांचे फोट टॅप झाले - संजय राऊत
10:15 March 26
केंद्र सरकार सगळ्याचेच फोन टॅपिंग करत आहे - संजय राऊत
06:17 March 26
Live Updates : फोन टॅपिंग ,'अँटिलिया' स्फोटके, हिरेन हत्याकांड, सचिन वाझे अटकेसंदर्भातील घडामोडी एका क्लिकवर
मुंबई - अँटालिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे अटक, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप, पाठोपाठ फोन टॅपिंग प्रकरण, या स्फोटक घटनाक्रमानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चर्चेत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पत्राचा हवाला देत, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात आर्थिक गैरव्यवहार सुरू आहेत, असा आरोप केला होता. महाविकास आघाडी सरकारने सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत, तत्कालीन गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सध्याचे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला. या अहवालात रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचे समोर आले आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवल्याचं प्रकरणात सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने निर्देश दिले आहे. 'अँटालिया' या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरण मृत्यू प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावा सचिन वाझे यांनी गुरुवारी एनआयए विशेष न्यायालयात केला.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आधार घेत राज्यातील विरोधी पक्षांनी राज्यपालाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
काय प्रकरण ?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या, वाहनांच्या काही बनावट नंबर प्लेट आणि एक धमकीचे पत्र मिळाले होते. अँटिलिया प्रकरणाचा तपास करताना स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. तपास अधिकारी सचिन वाझे आणि हिरेन एकमेकांना ओळखत असल्याची माहिती तपसात समोर आली. त्यानंतर वाझेंना क्राईम ब्रँचमधून हटवले गेले. दरम्यान अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची एन्ट्री झाली. त्यांनी वाझेंना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने वाझेंना 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी दिली.
मनसुख हिरेन यांची हत्या केल्याप्रकरणी नरेश रमणीकलाल गोर (वय ३१) आणि विनायक बाळासाहेब शिंदे (वय ५१) या दोघांना एटीएसने अटक केली. या दोघांचा ताबा एनआयएने घेतला आहे. अटक केलेला आरोपी नरेश गोर हा मुंबईत बुकी म्हणून बेकायदेशीर धंदा करत होता. त्यानेच सचिन वाझेंना सिमकार्ड पुरवले आहेत. दुसरा आरोपी विनायक शिंदे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी आहे. लखन भैया बनावट चकमकीप्रकरणी शिंदे आरोपी होता. ठाणे सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा सर्व तपास आता एनआयए करणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना एनआयएकडे सुपूर्द केले. तसेच हा तपासही एनआयएकडे हस्तांतरीत केला आहे.