महाराष्ट्र

maharashtra

'निसर्ग'चा प्रकोप सरकारच्या नियंत्रणाखाली : राज्य सरकार

By

Published : Jun 3, 2020, 5:13 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'निसर्ग' चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने बोलून माहिती घेत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

nisarga cyclone live updates
निसर्ग चक्रीवादळ

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'निसर्ग' चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने बोलून माहिती घेत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मुंबईची परिस्थिती नियंत्रणाखाली असून पुढील तासाभरात चित्र स्पष्ट होईल असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत धडकणार निसर्ग चक्रीवादळ...

हेही वाचा...मुंबई समुद्र किनाऱ्यालगतच्या 10,840 नागरिकांची सुरक्षित स्थळी रवानगी

मुंबई पालिका आयुक्त इकबालसिंग चहल तसेच प्रभाग अधिकाऱ्यांशी बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वादळामुळे कमीतकमी नुकसान कसे होईस, हे पाहण्याच्या सूचना देत आहेत. चक्रीवादळ मुंबई, ठाण्यातुन उत्तर महाराष्ट्राकडे जाताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करावे आणि सावधानता बाळगावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

निसर्ग चक्रीवादळ मुंबई, ठाण्यातून उत्तर महाराष्ट्राकडे जाताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने बचाव कार्य राबवून सावधानता बाळगण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. रायगड जिल्ह्यात 1,500 स्थलांतरित नागरिकांना अलिबाग तालुक्यातील थळ येथे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाने माहीम कॉजवेच्या बाजूला असणाऱ्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना जवळील महापालिका शाळांमध्ये स्थलांतरित केले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
संध्याकाळी चारच्या सुमारास ईटीव्ही भारतने मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता, राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे सांगण्यात आले.

निसर्ग वादळापासून मुंबईचा बचाव झाल्याची माहिती स्कायमेट संस्थेने दिली होती. परंतु, मंत्रालयातील नियंत्रण कक्षाने या माहितीला दुजोरा दिलेला नाही. राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून पुढील तासभर वारा आणि पाऊस असेल, अशी माहिती मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details