महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात संचारबंदीला सुरूवात; जाणून घ्या कोरोनासंबंधीच्या ताज्या घडामोडी..

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 15, 2021, 8:50 AM IST

Updated : Apr 15, 2021, 10:11 PM IST

18:06 April 15

मुंबईमध्ये आयसीयू अन् व्हेंटिलेटर बेडची कमतरता

व्हेंटिलेटर बेडची कमतरता

मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर अधिक भार हा निर्माण झालेला आहे. मुंबईमध्ये सरासरी दिवसाला दहा हजार रुग्ण सापडत आहेत. कोरोना झालेले रुग्ण हे सरकारी रुग्णालयात जाण्यापेक्षा खासगी रुग्णालयात जाण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड हे शिल्लक नाहीत. काल (दि. 14 एप्रिल) दिवसभरात मुंबईमध्ये फक्त 12 व्हेंटिलेटर बेड आणि 45 आयसीयू बेड शिल्लक होते, अशी प्राथमिक माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली होती.

17:54 April 15

पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा फुल्ल

पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर फुल्ल

पुणे- पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर देखील आठवड्याभरात फुल्ल झाला आहे. एकूण 652 बेडची क्षमता असलेल्या या जम्बो कोविड केअर सेंटर मध्ये 500 ऑक्सीजन बेड, 100 आयसीयू आणि 52 व्हेंटिलेटर बेड्स आहे. पुण्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णाने पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर हा आत्ताच्या घडीला पूर्णपणे फुल्ल झाले आहे. सरकारी रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरली असून खासगी रुग्णालयांमध्ये देखील बेड उपलब्ध होत नाही.

17:51 April 15

मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या शेकडो वाहनांवर कारवाई

शेकडो वाहनांवर कारवाई

मुंबई -मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबईसह राज्यात आजपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलिसांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील भायखळा येथे पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी लावली आहे. ही नाकाबंदी 1 मे पर्यंत दिवस रात्र सुरू राहील, असे वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

17:42 April 15

महाराष्ट्रातील 361 नमुन्यांपैकी 61 टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन

कोरोनाचे डबल म्युटेशन

मुंबई - राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमध्ये काय बदल झाले हे जाणून घेण्यासाठी त्याच्या नमुन्यांची तपासणी वेगवेगळ्या जीनोम सीक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये केली जात आहे. या प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या 361 नमुन्यांपैकी 61 टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे दिसून आले आहे अशी माहिती जीनोम तज्ज्ञांनी दिली आहे.

17:21 April 15

कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रानेही या महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत गरजू लोकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. या संदर्भातील पत्र व्यवहार राज्य सरकारकडून करण्यात आल्याचे समजते.

13:20 April 15

एकीकडे रेमिडेसीवीरचा तुटवडा, तर दुसरीकडे काळाबाजार सुरूच; पाच जणांना अटक, 4 इंजेक्शन जप्त

पुणे :शहरात एकीकडे रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा असताना दुसरीकडे मात्र या इंजेक्शनचा काळाबाजार मात्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. तब्बल 18 हजार रुपये किमतीला रेमडिसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 4 इंजेक्शन जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

13:19 April 15

नागपुरात शहरात ६० ठिकाणी नाकेबंदी, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू

राज्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावलेला आहे. आजच्या स्थितीत उपराजधानी नागपुरातील कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण झालेली असल्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे केली जात असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

11:56 April 15

लॉक डाऊनचा पहिला दिवस, नागरिक रस्त्यावर

औरंगाबाद -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. मात्र पहिल्या दिवशी नागरिक रस्त्यावर आल्याचं दिसून आलं. त्यामुळे लावलेल्या नव्या निर्बंधांमुळे कोरोना आटोक्यात येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

11:56 April 15

रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील इंटरकॉन्टिनेंटल; ट्रायडंट हॉटेल पालिकेने घेतले ताब्यात

मुंबई - मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेड्स कमी पडत आहेत. त्यासाठी पालिकेने लक्षणे असलेल्या रुग्णांवर रुग्णालयात तर इतर लक्षणे नसलेल्या व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर हॉटेलमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने इंटरकॉन्टिनेंटल, ट्रायडंट हे दोन हॉटेल ताब्यात घेतले आहेत. या हॉटेलमध्ये बॉम्बे हॉस्पिटल तसेच एच एन रिलायन्स रुग्णालयाकडून उपचार केले जाणार आहेत. तसेच इतर ठिकाणीही बेड्स वाढवले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

11:55 April 15

नियमांचे पालन करा, विनाकारण बाहेर पडल्यास दंडात्मक कारवाईबरोबरच गाडीही जप्त करू - डॉ. बलकवडे

कोल्हापूर : आजपासून संपूर्ण राज्यभरात पुढचे १५ दिवस संचारबंदी लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सुद्धा नियमावली जाहीर करण्यात आली असून कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये, शिवाय ज्यांना परवानगी नाहीये त्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवावेत. घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाईसह वेळप्रसंगी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिला आहे. आजपासून सर्वत्र 15 दिवस संचारबंदी आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचे म्हटले आहे.

11:55 April 15

धारावी मधील परप्रांतीय मजूर धास्तावले, पुन्हा एकदा धारावी रिकामी होण्याच्या मार्गावर..

मुंबई :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होणार या काळजीने परप्रांतीय मजुरांना छोटे मोठे व्यावसायिक हातावर पोट असणारे कामगार,मजूर,टपरीचालक हॉटेल व्यवसायिक फळे व भाजीपाला विक्रेत्यांन सह सर्वांनीच मोठी धास्ती घेतली आहे. गतवर्षाचा मार्च एप्रिल महिना आठवताच लहानथोरांच्या अंगावर शहारे येतात लॉकडाउनच्या भीतीने परप्रांतीय मजूर गावी परतण्याच्या विचारात आहे तर काही मजुरांनी गावी पळही काढला आहे गतवर्षी कोरणामुळे राज्य व देशात लॉकडाऊन करण्यात आले होते खेडोपाडी एमआयडीसी व शहरात पोट भरणारे मजूर व नोकरदार आपल्या राज्यात व गावी परतले आहेत.

11:54 April 15

बारामतीत संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद, बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात..

बारामती - वाढत्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिल ते १ मे दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आज बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना कडकडीत बंद असून बारामतीतून याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

11:54 April 15

विकेंड लॉकडाऊनमध्ये एसटी विभागाचा मोठा तोटा; दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचे नुकसान

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केला होता. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. मात्र प्रवाशांअभावी रत्नागिरी विभागाच्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला. रविवारी दिवसभरात अवघ्या ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे.

11:53 April 15

भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चाललाय. आता कोरोनाचे रुग्ण उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळालीय.
 

10:33 April 15

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील इंटरकॉन्टिनेंटल, ट्रायडंट हॉटेल पालिकेने घेतले ताब्यात

  • मुंबईत 5 स्टार हॉटेलमध्ये खासगी रुग्णालय करणार कोरोनावर उपचार.
  • दोन 5 स्टार हॉटेल आणि 2 रुग्णालयांपासून याची सुरुवात.
  • गंभीर रुग्ण नसलेल्या रुग्णांवर हॉटेलमध्ये, तर गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार होणार.
  • इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल, मरिन ड्राईव्ह येथे बॉम्बे हॉस्पिटल सुविधा देणार.
  • बीकेसी येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये एच. एन. रिलायन्स रुग्णालय सुविधा देणार.

इतक्या खाटा वाढवणार -

  • जसलोक हॉस्पिटलमधील 250 बेड ताब्यात घेणार त्यातील 40 बेड आयसीयू चे असणार आहेत.
  • अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात 30 आयसीयू बेड वाढवणार.
  • गोरेगाव नेस्को येथील जंबो कोविड सेंटरमध्ये 1500 बेड वाढवणार त्यातील बहुतेक बेड हे ऑक्सिजनचे असणार.
  • पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची माहिती.

10:32 April 15

जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी; नागरिकांचा 100 टक्के प्रतिसाद

रत्नागिरी जिल्ह्यात लाॅक डाऊनची कडक अमंलबजावणी करण्यात येत आहे. काल रात्री आठपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीही नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, रस्त्यांवर गाड्या घेऊन येणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच विनाकारण बाहेर येणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे.

09:46 April 15

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील संचारबंदीचा आढावा..

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील संचारबंदीचा आढावा..

09:46 April 15

पुणे मार्केट यार्ड परिसरातील संचारबंदीचा आढावा..

पुणे मार्केट यार्ड परिसरातील संचारबंदीचा आढावा..

09:46 April 15

कोल्हापुरातील संचारबंदीचा आढावा; पाहा कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद..

कोल्हापुरातील संचारबंदीचा आढावा; पाहा कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद..

08:56 April 15

मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट, केवळ सार्वजनिक वाहतूक सुरू..

मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट, केवळ सार्वजनिक वाहतूक सुरू..

08:42 April 15

राज्यात संचारबंदीला सुरूवात; जाणून घ्या कोरोनासंबंधीच्या ताज्या घडामोडी..

मुंबई :राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक उपायोजना करून देखील कोरोनावर नियंत्रण मिळत नसल्याने, अखेर मुख्यमंत्र्यांनी अधिक कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री 8 वाजेपासून नव्या निर्बंधांना सुरुवात झाली आहे. पुढील 15 दिवस म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध असणार आहेत.

Last Updated : Apr 15, 2021, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details