- सुधीर फडकेंमुळे माझी लता मंगेशकर यांच्याशी भेट झाली.
- मंगेशकर परिवाराचे या देशासाठी मोठे योगदान
- मी हा पुरस्कार देशाला अर्पण करतो.
PM Modi In Mumbai : पंतप्रधान मोदींनी स्विकारला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार; म्हणाले, पुरस्कार जनतेला अर्पण - लता मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा
18:17 April 24
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
18:09 April 24
पंतप्रधान मोदींनी स्विकारला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. मंगेशकर कुटुंबियांनी मोदींचे यावेळी आभार मानले.
18:07 April 24
लता दिदिंकडून मला मोठ्या बहिणीचे अपार प्रेम मिळाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- संगीत ही एक साधना आहे आणि भावनाही आहे.
- लता दिदिसोबत माझे नाते किती जुने आहे, याची उजळणी करत होतो, तेव्हा लक्षात आले की चार साडेचार दशकांपासून मंगेशकर कुटुंब माझ्या आयुष्याचा हिस्सा झाले आहे. सुधीर फडकेंनी लता दिदिंशी माझी ओळख करुन दिली होती.
- लता दिदिंकडून मला मोठ्या बहिणीचे अपार प्रेम मिळाले आहे.
- यंदाची राखी पौर्णिमा ही पहिली असेल जेव्हा लता दिदिची राखी माझ्या हातावर नसेल.
18:03 April 24
एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून पंतप्रधानांनी स्वीकारला पुरस्कार
- ह्रदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांची अनुपस्थिती आहे. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी कामना करतो. - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
17:17 April 24
पंतप्रधान नरेंद्र मोदी षण्मुखानंद सभागृहात दाखल झाले आहेत.
16:54 April 24
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, आदित्य ठाकरेंनी केले स्वागत
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.
16:28 April 24
LIVE Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत
मुंबई-गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने पहिला पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना देण्यात ( Lata Dinanath Mangeshkar Award 2022 ) येणार आहे. 11 एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 24 एप्रिल ला रविवारी मुंबई षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान स्वतः मुंबईत उपस्थित राहणार ( PM Modi Mumbai Tour ) आहेत. लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात देशाप्रती केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.