- किरीट सोमैया यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली
- शिवसैनिकांकडून किरीट सोमैया यांच्या गाडीवर दगडफेक
- चप्पलही मारल्या
- सोमैयांच्या गाडीच्या काचा फुटल्या
- सुरक्षा करणाऱ्या पोलिसांच्या गाडीची काच फुटल्याची माहिती
Rana Vs Shivsena : राणा दाम्पत्य अटकेत, भेटायला गेलेल्या किरीट सोमैयांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला - राणा दाम्पत्याचे उद्धव ठाकरे विरोधात आंदोलन
22:44 April 23
22:37 April 23
किरीट सोमैया यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
रात्री उशिरा किरीट सोमैया यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. चपलांनी गाडीला शिवसैनिकांनी मारले. गाडीला घेराव घातला. ते गेल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला.
19:44 April 23
- नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी किरीट सोमैया यांना खार पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे.
17:42 April 23
- आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
17:23 April 23
- राणा यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस राणा यांच्या खार येथील घरी दाखल
- आमच्यावर दबाव आणला जात असल्याची राणा दाम्पत्याचा आरोप
15:09 April 23
LIVE Update : 'त्याची ना बातमी झाली असती, ना त्याचा काही परिणाम झाला असता'
नागपूर - रवी आणि नवनीत राणा यांना मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायची होती. ते कुठल्यातरी कोपर्यात गेले असते आणि तेथे हनुमान चालीसा म्हटली असती. त्याची ना बातमी झाली असती, ना त्याचा काही परिणाम झाला असता, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांन दिली आहे.
15:04 April 23
नवनीत राणांचे फेसबुक लाईव्ह
- रवी आणि नवनीत राणांची माघार
- 'आजची शिवसेना ही गुंडांची शिवसेना'
- 'आम्ही शिवसेनेला घाबरत नाही'
- 'पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आंदोलन मागे घेत आहोत'
13:24 April 23
Live Update : राणा दाम्पत्याची नौटंकी सुरू, नवनीत राणांच्या घरावर दगडफेक झाली नाही - गृहमंत्री
मुंबई - राणा दाम्पत्य मातोश्रीपुढे हनुमान चालीसा पठणावर ठाम असतील तर कारवाई केली जाईल, असा इशारा आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी बोलताना त्यांनी राणा दाम्पत्याची नौटंकी सुरू आहे. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील असेही स्पष्ट केले.
13:17 April 23
Live Update : राणा दाम्पत्य हे पुढे केलेले प्यादे, कायदा हातात घेतला तर कारवाई करणार - गृहमंत्री
मुंबई - नवनीत राणा आणि रवि राणा हे पुढे केलेले प्यादे आहेत. त्यांच्या आडून राज्यात कायदा आणि सुवव्यस्था अबादित नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे नाव न घेता केला. राणा दाम्पत्य आपल्या हनुमान चालीसा पठणावर ठाम असतील तर कारवाई केली जाईल, असा इशाराही वळसे पाटील यांनी यावेळी दिला.
13:08 April 23
Live Update : राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा हेतू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई - भोंग्याच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राज ठाकरे यांच्या मशीदीवरील भोंगे हटवण्याच्या विषयावर राजकारण तापले आहे. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर सर्वपक्षीय बैठक बोलावल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हेतू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
12:49 April 23
Live Update : नवनीत राणा, रवि राणा दुपारी 3 वाजता घेणार पत्रकार परिषद, करणार मोठा खुलासा
मुंबई - नवनीत राणा आणि रवि राणा यांनी आज मातोश्रीपुढे हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या घराला घेराव घातला आहे. शिवसैनिकांनी त्यांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर रवि राणा आणि नवनीत राणा यांनी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठणाबाबत काय घोषणा करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
12:39 April 23
Live Update : शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक: राणांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचे काय, आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई -मोहित कंबोज यांच्या गाडीवर २५ लोकं येत असतील, तर असे तुमच्या बाबतीतही होऊ शकते असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. लोकशाहीला लोकशाहीने उत्तर द्यायला पाहिजे. मात्र शिवसैनिकांनी कायदा हातात घेतला. त्यामुळे ठोकशाहीने ठोकशीने उत्तर देऊ असा इशाराही शेलार यांनी दिला.
शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात आली, मग राणांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचे काय असा सवाल आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
12:32 April 23
Live Update : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी स्थिती, आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
मुंबई - शिवसैनिकांनी झुंडशाहीने मोहित कंबोज यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही कधीतरी एकटे जाणारच आहात, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती असल्याचेही शेलार यावेळी म्हणाले.
12:20 April 23
Live Update : राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी सुरू, प्रविण दरेकर यांचा आरोप
मुंबई -भाजपच्या पोल खोल अभियानविरोधात शिवसेनेची गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांच्या नजरेसमोर ही गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. आम्ही जशास तसे उत्तर देवू शकतो, पण आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहोत. झालेल्या प्रकाराबाबत आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र देवू. मात्र मुख्यमंत्री गप्प आहेत. ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे. याबाबत आम्ही गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशाराही प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
12:18 April 23
Live Update : भाजपच्या आमदार, खासदारांची पत्रकार परिषद सुरू, राष्ट्रपती राजवटीची करणार मागणी
मुंबई - मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. मोहित कंबोज यांनी शिवसैनिकांनी आपल्याला मॉब लिंचिंगमध्ये मारण्याचा कट रचल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
11:58 April 23
Live Update : मोहित कंबोज हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार खासदार घेणार राज्यपालांची भेट, राष्ट्रपती राजवट लावण्याची करणार मागणी
मुंबई - नवनीत राणा आणि रवि राणा यांनी आज मातोश्रीपुढे हनुमान चालीस पठण करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेत काल रात्री भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मातोश्रीपुढे हल्ला केला. याप्रकरणी भाजपचे नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. याप्रकरणी बाजपचे नेते राज्यपालांकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत.
11:32 April 23
Live Update : हनुमान चालीसा वाद प्रकरण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील 1 वाजता माध्यमांशी बोलणार
मुंबई - नवनीत राणा आणि रवि राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पटण करण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील 1 वाजता माध्यमांशी बोलणार आहेत.
11:24 April 23
Live Update : सरकारमध्ये असल्याने हात बांधलेले, शिखंडीच्या भूमिकेतून वार करणे बंद करा - संजय राऊत
नागपूर - भारतीय जनता पक्ष बायकांना समोर करून शिखंडीचे उद्योग करत आहे. हे बंद करा असा हल्ला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला. ते नागपुरात माध्यमांशी बोलताना होते.
कोणाच्या तरी पाठबळाने आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल शिवसैनिक काय स्वस्त बसतील का? असे म्हणत आमच्या घरात घुसाल तर तुम्हालाही घर आहे, हे विसरू नका. सरकारमध्ये असल्याने आमचे हात बांधलेले आहेत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
राणा दाम्पत्यांना आम्ही मोठे करण्याचा काम करत नाही. तर कालपर्यंत हिंदुत्वावर हल्ले करणाऱ्या बंटी बबलीना मोठे करण्याचे काम नव हिंदुत्ववादी ओबीसी लोक करत आहेत. सरकारने काय करावे, याचे सल्ले मुख्यमंत्र्यांनी एकूण घ्यायला महाराष्ट्राला भिकारी पण अजून आले नाही. तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या लायकीप्रमाणे राहा, लक्ष्मणरेषा ओलांडली तर शिवसैनिक सुद्धा संतापून तुमच्या घरापर्यंत येणार हे लक्षात ठेवा असा सल्ला राऊत यांनी दिला.
11:08 April 23
Live Update : राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा मातोश्रीबाहेर नव्हे त्यांच्या घरात वाचावी - गृहमंत्री
मुंबई - नवनीत राणा आणि रवि राणा हे हनुमान चालीसा प्रकरणावरुन राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वर्तनामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याऐवजी त्यांच्या घरातच हनुमान चालीसा पठण करावी असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
10:56 April 23
Live Update : शिवसैनिक पठ्ठ्याने सोलापूरहून आणल्या 25 गाड्या, अन् म्हणाला, हिम्मत असेल तर मातोश्रीवर येऊन दाखवा . . .
मुंबई - राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर शिवसैनिक संतप्त झाले आहे. काही कार्यकर्ते सोलापूर येथून आले आहे. तसेच राणा यांच्या इमारतीच्या बाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू आहे. एका संतप्त कार्यकर्त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.
10:43 April 23
Live: शिवसैनिक आमच्या घरावर हल्ला करत आहेत, पण मी 'मातोश्री'वर जाणारच - नवनीत राणा
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' या निवासस्थाना समोर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे अमरावतीच्या खासदार नवनित राणा आणि आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. तेव्हा पासून हा वाद चिघळत चालला आहे. मातोश्री भोवती शिवसैनिक खडा पहारा देत आहेत तर काहींनी राणा राहत असलेल्या इमारती खाली जोरदार घोषणाबाजी केली. सध्या दोन्ही भागात तणाव आहे.
आमदार रवी राणा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणले आहे की, महाराष्ट्र पोलीस आम्हाला घराबाहेर पडू देत नाहीत. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही नेहमीच 'मातोश्री'ला मंदिर मानले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र केवळ राजकीय फायदा मिळवत असल्याचा आरोपही रवि राणा यांनी केला.
09:52 April 23
Live Update : पंधरा तासांनी जरी आले तरी आम्ही इथेच, शिवसैनिक तुम्हाला प्रसाद देतील - विनायक राऊत
मुंबई -तुम्ही कधीही या, पंधरा तासांनी जरी आले तरी आम्ही इथेच आहोत. आम्ही तुमची वाट बघत आहे. शिवसैनिक ( Vinayak Raut news Mumbai ) तुम्हाला प्रसाद देतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते विनायक राऊत ( Vinayak Raut on Navneet Rana visit to Matoshree ) यांनी दिली. तुम्ही कधीही या, पंधरा तासांनी जरी आले तरी आम्ही इथेच आहोत. आम्ही तुमची वाट बघत आहे. शिवसैनिक ( Vinayak Raut news Mumbai ) तुम्हाला प्रसाद देतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते विनायक राऊत ( Vinayak Raut on Navneet Rana visit to Matoshree ) यांनी दिली.
09:31 April 23
Live Update : राणा दाम्पत्याची नौटंकी सुरू आहे, पोलीस कारवाई करतील - गृहमंत्री
मुंबई -खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी रात्रभर मातोश्रीवर पहारा दिला आहे. यासह राणा दाम्पत्य कधीही आले, तरी त्यांना प्रसाद दिला जाईल असे बॅनरही मुंबईत लागले आहेत.