नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील उमरडा येथील वाघाची शिकार करून अवयव विक्री करतांना नागपूरच्या बुट्टीबोरी भागातून टोळीला अटक करण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाने 7 आरोपींना अटक करून चौकशी सुरू केली होती. यात 4 जणांना अटक करण्यात आली असून शिकार केलेल्या वाघाचे अवयव जप्त करण्यात आले.
Breaking News: शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सह्याद्री अतिथीगृहात बैठक, अनेक मुद्यांवर चर्चा
18:30 October 18
वाघाची शिकार करून अवयव विक्री करणाऱ्या टोळीला अटक, वाघाचे अवयव जप्त
18:29 October 18
रेशन धान्य दुकानातील धान्यात आढळल्या अळ्या, कोल्हापुरातील प्रकार
कोल्हापूर -रेशन धान्य दुकानातील धान्यात आळ्या आढळल्या आहेत. करवीर तालुक्यातील रेशन धान्य दुकानात हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडने धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
18:27 October 18
राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार, अम्युझमेंट पार्क देखील होणार सुरू
मुंबई - राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट झाले आहे. अम्युझमेंट पार्क देखील सुरू करण्यात येणार आहेत. लहान मुलांचे लसीकरण, कोविड नियमांचे पालन याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
18:25 October 18
कल्याणच्या कारागृहात तब्बल 20 कैद्यांना कोरोना, प्रशासन सतर्क
ठाणे - कल्याणच्या कारागृहात तब्बल 20 कैद्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवले. प्रशासन अलर्ट झाले आहे.
18:23 October 18
राष्ट्रवादीचे बॅनर फाडण्यामागे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे - राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा आरोप
ठाणे - ठाण्यातील खारेगाव भागात दोन दिवस पूर्वी लसीकरण कॅम्प वरील नागरिकांना आव्हान करण्याचे राष्ट्रवादीचे बॅनर सेनेने फाडले असल्याचा आरोप ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला होता बॅनर फाडतानाचे दृश्य CCTV फुटेज मध्ये कैद झाले आहे. हे बॅनर फाडण्यामागे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हेच असल्याचा गौप्यस्फोटही आनंद परांजपे यांनी केला आहे.
17:02 October 18
देश लवकरच 100 कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा गाठणार - डॉ. भारतीताई पवार
पुणे - कोरोना लसीकरनाचा शंभर कोटींचा टप्पा लवकरच गाठणार, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी म्हटले आहे. पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत.
17:01 October 18
शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू आहे. राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणांचा वाढलेला हस्तक्षेप, थकीत जीएसटीचा निधी, अतिवृष्टी अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबतही रणनिती आखली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे संपूर्ण लक्ष लागले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, दिलीप वळसे पाटील असे महाविकास आघाडी सरकारचे नेते उपस्थित आहेत.
16:59 October 18
जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध
जळगाव - जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धरणगाव, पारोळा व एरंडोल मतदारसंघात प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा मात्र 8 नोव्हेंबर रोजी माघार घेण्याच्या अंतिम तारखेनंतर होण्याची शक्यता आहे. धरणगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, पारोळा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, तर एरंडोल मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. हे महाविकास आघाडीला मोठे यश मानले जात आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर शिवसेनेला दोन जागांवर यश आले आहे
15:49 October 18
लवकरच भाजपचे १५ ते २० नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश ?
मुंबई - स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लवकरच भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील भाजप नगरसेवकांमध्ये पक्षाबद्दल नाराजी आहे. पालिकेतील भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये धमाका होणार असल्याचे म्हटले आहे.
13:20 October 18
प्राध्यापक राजन शिंदे खुनातील शस्त्र सापडले
औरंगाबाद ब्रेकिंग :-
प्राध्यापक राजन शिंदे खुनातील शस्त्र अखेर सापडले.
खून करून आरोपीने हत्यारे फेकले होते विहरीत.
व्यायाम करायचे डंबेल, चाकू आणि टॉवेल पोलिसांनी केले जप्त.
8 दिवस पूर्ण झाल्या नंतर अखेर घराशेजारच्या विहिरीत मिळाले शस्त्र.
13:10 October 18
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांना पक्षविरोधी कारवाईमुळे निलंबनाची नोटीस
नागपूर ब्रेकिंग
नागपूर - आशिष देशमुख यांच्या पक्ष विरोधात कारवाईमुळे निलंबन का करण्यात येऊ असा खुलासा मागवण्यात आला आहे. यावर सात दिवसात उत्तर न दिल्यास आपल्यावर निलंबनाची करवाई करण्यात येईल असे पत्र आशिष देशमुख यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकामध्ये भाजपचा प्रचार करण्याचे पुरावे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर विदर्भ प्रभारी हंडोरे यांनी त्यांना समजही दिली. मात्र तरीही पक्षविरोधी कारवाया थांबत असल्यामुळे आपणास निलंबित का करण्यात येऊ नये यासंदर्भात खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. आमच्या प्रतिनिधीने देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रतिसाद देत नाहीत.
09:40 October 18
फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक
पुणे ब्रेकिंग -
फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक.
शेरबानो कुरेशी असे या महिला असिस्टंटचे नाव.
2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली.
2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात
याच गुन्हयात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली.
किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांची दोन पथकं कार्यरत
महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जातोय.
उद्या करणार कुरेशील कोर्टात हजर
09:37 October 18
नागपूर फ्लॅश - नागपूरच्या सोनेगाव परिसरातील ममता सोसायटी मध्ये १४ श्वानांची हत्या
नागपूर फ्लॅश -
नागपूरच्या सोनेगाव परिसरातील ममता सोसायटी मध्ये १४ श्वानांची हत्या
विष देऊन मारले की अन्नातून विष बाधा ते अस्पष्ट
पोलिसांनी नोंदविला अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा
09:34 October 18
यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार का? यावर आज निर्णय होण्याची शक्यता
नागपूर फ्लॅश
यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार का? यावर आज निर्णय होण्याची शक्यता
विधिमंडळ सचिव आज घेणार तयारीचा आढावा
विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत आज अधिकाऱ्यांची घेणार बैठक
बैठकीच्या निकालावर अवलंबुन असेल नागपूर मधील हिवाळी अधिवेशन
डिसेंबर 2019 नंतर नागपूरमध्ये अधिवेशन झाले नाही
नागपूर करारानुसार 1 अधिवेशन नागपूर मध्ये होणे अपेक्षित
09:06 October 18
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली कोरोना टास्क फोर्स समितीची बैठक
मुंबई फ्लॅश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली टास्क फोर्स समितीची बैठक
राज्यातील कोविड स्थितीचा घेणार आढावा
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लस घेतलेल्यांना रेल्वेप्रवास मुभा देण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते
या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे
08:32 October 18
सिंहगड एक्स्प्रेस आजपासून सुरू
पुणे -
19 महिने बंद असलेली सिंहगड एक्स्प्रेस आजपासून मुंबई, पुणेकरांच्या सेवेत दाखल
08:10 October 18
रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे हायवेवर अपघात, तीन जणांचा मृत्यू
रायगड अपघात ब्रेकिंग
मुंबई-पुणे हायवेवर सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 6 वाहने बाधित झाली आहेत. मुंबई पुणे हायवेवरील किलोमीटर 39 या ठिकाणी अपघात झाला. या ठिकाणी कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कोंबड्यांची गाडी घेऊन नेणाऱ्या टेम्पोमधील वाहन चालकाचाही जागीच मृत्यू झाला आहे.
07:10 October 18
शेतकरी संघटचे राज्यमंत्री टेनी यांच्या राजीनाम्यासाठी आज 'रेल-रोको' आंदोलन
लखीमपूर खेरी घटना : शेतकरी संघटनेने राज्यमंत्री टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज 'रेल-रोको' आंदोलन पुकारले
06:35 October 18
Breaking News: ठाण्याच्या घोडबंदर रोडवर तेलाने भरलेला टँकर उलटला
ठाणे - घोडबंदर रोडवर टँकर उलटण्याचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी घोडबंदर रोडवरील गायमुख नाक्याजवळ तेलाने भरलेला टँकर उलटला. या टँकरमधील 25 टन कच्चे तेल रस्त्यावर पसरले आहे.
आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्यावरील तेल बाजुला काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.