महाविकास आघाडीमध्ये काही निर्णय घेता येत नव्हते. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहेत. काल झालेल्या निर्णयाचे स्वागत एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
Maharashtra Gov Formation 2022 : एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस
16:53 June 30
महाविकास आघाडीमध्ये काही निर्णय घेता येत नव्हते - एकनाथ शिंदे
16:36 June 30
एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
मुंबई - एकनाथ शिंदे हे गटनेते आहेत. शिवसेनेच्या आमदारांची मोठ्या प्रमाणात कुंचबणा झाली आहे. आमच्याकडून हारलेले विरोधकांना मोठ्या प्रमाणात निधी देत असतील. त्यामुळे शिवसेना आमदारांना बाहेर पडावे लागले. आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही आहेत. ही तत्वाच्या आहे. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
16:25 June 30
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट; सरकार स्थापनेचा केला दावा
मुंबई - एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
15:56 June 30
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा संध्याकाळी 7 वाजता शपथविधी!
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आहेत. ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत. यावेळी ते सत्ता सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. त्यामुळे संध्याकाळी सात वाजता शपथ विधी घेण्याची शक्यता आहे. अशी माहिती ही सुत्रांनी दिली आहे .
15:19 June 30
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल, बैठक सुरु
मुंबई - बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. तेथे त्या दोघांमध्ये बैठक सुरू आहे.
14:46 June 30
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना
मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे गुवाहाटीवरुन गोव्यात काल दाखल झाले होते. तेथून ते आज अंधेरी विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. ते प्रचंड सुरक्षा दलासह विमानतळाच्या बाहेर पडत आहेत.
14:18 June 30
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनवर जाणार
सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज राजभवनवर जाणार आहेत.
13:55 June 30
राजभवनवर हालचाली वाढल्या, मुंबई पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापण्यात येणार आहे. राजभवनवर हालाचाली वाढल्या आहेत. अशा स्थितीत मुंबई पोलिसांचा राजभवनवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
13:28 June 30
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांचे पहिले ट्विट, म्हणाले...
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:च कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा अधोगतीकडे प्रवास सुरू होतो. त्यांनी नामोल्लेख न करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
13:08 June 30
शिवसेना पक्षावर कुणीही दावा केला नाही - दीपक केसरकर
शिवसेना पक्षावर कुणीही दावा केला नाही, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा चुकीची आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
12:45 June 30
एकनाथ शिंदेंसह आठ बंडखोर मंत्र्यांविरोधातील याचिका सुनावणीपूर्वी 1 लाखांची अनामत रक्कम जमा करा -उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश
एकनाथ शिंदेंसह आठ बंडखोर मंत्र्यांविरोधातील याचिका सुनावणीपूर्वी 1 लाखांची अनामत रक्कम जमा करा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश दिले आहेत. एकनाथ शिंदेंसह आठ बंडखोर मंत्र्यांविरोधातील याचिका राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्यातील सात नागरिकांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत मिळून याचिका दाखल केली होती.
12:12 June 30
एकनाथ शिंदे गोव्यावरून रवाना, पण...
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे दहा दिवसानंतर आज मुंबईत दाखल होणार आहेत. शिंदे हे गोव्यावरून रवाना झाला आहेत. पण, आमदार हे आज गोव्यातच असणार आहेत.
12:11 June 30
काँग्रेसची विधान भवनात बैठक सुरू
मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आहे. राज्यामध्ये पूर्व अशी राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पुढील रणनीती आखण्यासाठी आणि वाटचालीसाठी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज विधान भवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस आघाडी बाबत आणि आगामी वाटचालीबाबत चर्चा करत आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुनील केदार ,विश्वजीत कदम, सतेज पाटील ,संग्राम थोपटे आदि काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.
11:01 June 30
एकनाथ शिंदे गटाला भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे मिळणार, स्वत:हून एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
09:59 June 30
उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला- संजय राऊत
उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उत्तम खाती दिल्यानंतर आपल्याच लोकांनी दगा दिला. ज्यांना सरकार पाडायचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते, त्यांनी सरकार पाडले, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.
09:48 June 30
भाजपचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, किरीट सोमैय्या यांचे सूचक ट्विट
महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार येणार ... पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल ........ मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल, अशा विश्वास भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
09:41 June 30
भाजप सत्ता स्थापनेचा करणार दावा, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता
भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता आहे. शिंदे गटाबरोबर सत्ता स्थापन करून भाजप नेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
09:20 June 30
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना संबोधित करणार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे गोव्यात मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांना संबोधित करणार आहेत. ही माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिले.
09:11 June 30
आता फ्लोअर टेस्टची गरज नाही, विशेष अधिवेशन नाही- राजेंद्र भागवत
महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी राज्यातील सर्व आमदारांना कळवले की राज्यपालांच्या आदेशानुसार आता फ्लोअर टेस्टची गरज नाही, त्यामुळे आजचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि त्यांच्या MLC पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली
08:46 June 30
औरंगाबदचे नाव संभाजीनगर केल्याने एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील संतप्त
उद्धव ठाकरे यांनी सत्ता गमावित असताना औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले. ही चिप पॉलिटिक्सचे उदाहरण आहे, अशी टीका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. त्यांना मी सांगू इच्छितो की, केवळ नावे बदलता येतात. इतिहास बदलता येत नाही. औरंगाबादचे नाव कोणते राहील हे लोकच ठरवू शकतात, असेही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले.
08:42 June 30
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बंडखोर आमदारांची घेतली भेट
गुवाहाटी होऊन गोव्यात दाखल झालेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली. पोलीस सुरक्षा व इतर परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
08:13 June 30
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली...
आज सकाळी ११ वाजता भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सागर बंगल्यावर होणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी उपस्थित राहणार आहेत.
07:43 June 30
शिंदे गटाची आज १० वाजता गोव्यात होणार बैठक
शिंदे गटाची आज गोव्यात १० वाजता बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गट आणि भाजपसाठी सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे.
07:12 June 30
शिंदे गटातील आमदारांनी आज नको, शपथविधीच्या दिवशी यावे- चंद्रकांत पाटील
शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत पोहोचणा आहेत. त्यांना मी विनंती करतो की उद्या येऊ नका. त्यांनी शपथविधीच्या दिवशी यावे, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
07:08 June 30
मुंबईतील राजकीय परिस्थिती पाहता पोलीस अॅक्शन मोडमध्ये, मुंबईला छावणीचे स्वरूप
मुंबई-शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटी येथून मुंबईत दाखल होणार आहेत. आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा वापर करण्यात येणार असल्याचे समजते आहे. याशिवाय राज्य पोलिसांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे.
06:52 June 30
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार- सूत्र
1 जुलैला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यांच्यासोबत 10 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यातील पाच ते सहा मंत्री भाजप तर इतर एकनाथ शिंदे गटातील असणार आहेत.
06:30 June 30
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा स्वीकारला राजीनामा, राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना सांगितली महत्त्वाची गोष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
06:14 June 30
Maharashtra Gov Formation 2022 : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला सामोरे जावे लागेल, असा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिंदे गट आणि भाजपकडून राज्यात सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. अशात सत्तेची समीकरणे कशी जुळणार हे पाहणे महत्त्वाचे ( Maharashtra gov formation 2022 ) ठरणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. यावर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्ध्या तास घेतला होता. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, ( SC Decision About Assembly Floor Test ) असा निर्णय दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडिया वरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले.
शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय - उद्धव ठाकरे सरकारच्या शेवटची मंत्रीमंडळ बैठक सायंकाळी पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर ( Aurangabad renamed Sambhajinagar ) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव ( Dharashiv Naming Of Osmanabad करण्याच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांच्या सहकारने मंजुरी दिली. अनेक वर्षापासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला हा महत्त्वाचा निर्णय आज अखेर मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासोबतच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव ( Mumbai Airport To Be Name As D B Patils Name ) देण्याच्या निर्णयासही मंजुरी देण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. यावर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्ध्या तास घेतला होता. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, ( SC Decision About Assembly Floor Test ) असा निर्णय दिला आहे. ( Supreme Court on Maha Vikas Aghadi petition ) ( supreme court decision on Thursday Assembly Floor Test )
भाजप करणार सत्तेस्थापनेचा दावा-शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. ५० हून अधिक आमदार शिंदे यांच्या गोटात सामील झाले. महाविकास आघाडी सरकार यामुळे अल्पमतात आले. बंडखोरांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केले. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. अखेर बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेश न जुमानता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बंडखोर आमदारांना ११ जुलै पर्यंत दिलासा दिला.
हेही वाचा-Maharashtra Political Crisis : भाजप करणार सत्तास्थापनेचा दावा
2 हजार सीआरपीएफ जवान दाखल -महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षामध्ये उद्या गुरुवार दिनांक 30 रोजी महाविकास आघाडीला बहुमत चाचणीचे निर्देश राज्यपालांनी दिले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आज मुंबईत परत येणार आहेत. त्यावेळी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबईमध्ये 2 हजार सीआरपीएफ जवान दाखल झाले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ( 2000 CRPF commando arrived in Mumbai ) ( 2000 CRPF Commando in Mumbai )