महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

LIVE Updates : माथाडी कामगाराचा मुलगा माथाडी कामगार व्हावा हे दुर्दैवी - जयंत पाटील (शेकाप) - LIVE : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022

LIVE : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022
LIVE : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022

By

Published : Mar 9, 2022, 10:39 AM IST

Updated : Mar 9, 2022, 1:39 PM IST

13:38 March 09

भाजपच्या सदस्यांचा विधानपरिषदेतून सभात्याग

देशद्रोह्यांशी संबंध असलेल्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी भाजपने विधान परिषदेत मागणी केली. सभापतींनी ही मागणी फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्यांनी परिषदेतून सभात्याग केला.

13:02 March 09

सभापती रामराजे निंबाळकर यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृह सुरू होताच नवाब मलिक यांच्या राजिनाम्याची मागणी केली. मात्र, सभापती रामराजे निंबाळकर यांनी मागणी फेटाळून लावत प्रश्नोत्तराचे कामकाज सुरू केले.

12:58 March 09

नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा - प्रवीण दरेक

नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा असे म्हण प्रवीण दरेक आक्रमक झाले. ते विधिमंडळाच्या परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

12:49 March 09

LIVE Updates : माथाडी कामगाराचा मुलगा माथाडी कामगार व्हावा हे दुर्दैवी -जयंत पाटील (शेकाप)

माथाडी कामगारांचा मुलगा माथाडी कामगारच व्हावा हे फार दुर्दैवी आहे असे मत शेकापचे जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. त्यावर मंत्री मोहदयांनी आपण यामध्ये लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.

12:17 March 09

पडळकर यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी -अनिल परब

सभागृहाचा एक ढाचा आहे. असे वक्तव्य करू नये असे म्हणत सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी परब यांनी केली होती. त्यावर अनावधानाने चुकीचे वक्तव्य झाले असेल आणि त्यावरुन कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो असे पडळकर म्हणाले आहेत.

12:14 March 09

सतीश चव्हाण यांनी आक्षेपार्ह विधान केले; त्याबाबत त्यांनाही समज द्या -प्रविण दरेकर

सभागृहात गोपीचंद पडळकर यांच्या वक्त्याव्यांवरू गदारोळ झाला. त्यावर बोलताना, सभागृह समानतेने चालते असे म्हणत सतीश चव्हाण यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याबाबत त्यांनाही समज द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

11:22 March 09

पोलिसांवर लोकांचा बिलकूल विश्वास नाही -विनायक मेटे

पोलिसांवर लोकांचा बिलकूल विश्वास नाही, आणि सरकारवर तर नाहीच नाही असे म्हणत राज्यात अंमली पदार्थांचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

11:22 March 09

सहयोगी प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन थांबवावे -अमित देशमुख

सफाई कर्मचाऱ्यांच्या जागी वारसाहक्काने नियुक्त करण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे. सहयोगी प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन थांबवावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची केले आहे.

11:19 March 09

समितीच्या शिफारशीनुसार नोकर्‍या दिल्या जातील -धनंजय मुंडे

सफाई कामगारांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकर्‍या दिल्या जातील अशी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे.

10:47 March 09

मुंबई - नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानभवनच्या पायऱ्यांवर भाजपच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी

मुंबई -नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानभवनच्या पायऱ्यांवर भाजपच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी

10:43 March 09

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. भाजप सत्तेत असताना सर्वाधिक गुन्हे up आणि त्यानंतर महाराष्ट्र घडले असा आरोप पधवीधर आमदार अभिजित वंजरी यांनी केला आहे .

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. भाजप सत्तेत असताना सर्वाधिक गुन्हे up आणि त्यानंतर महाराष्ट्र घडले असा आरोप पधवीधर आमदार अभिजित वंजरी यांनी केला आहे .

10:40 March 09

देवेंद्र फडणवीस यांनी काल सदनात केलेले आरोप गंभीर आहेत. याबाबत सत्यता राज्यसरकार कडून पडताळाली जाईल. अशी प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री सतेज पाटील दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल सदनात केलेले आरोप गंभीर आहेत. याबाबत सत्यता राज्यसरकार कडून पडताळाली जाईल. अशी प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री सतेज पाटील दिली आहे.

10:15 March 09

LIVE Updates : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022

LIVE Updates : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022

Last Updated : Mar 9, 2022, 1:39 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details