महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांचे पोस्टर जाळले

Maharashra political update
महाराष्ट्र राजकीय घडामोडी

By

Published : Jun 26, 2022, 6:21 AM IST

Updated : Jun 26, 2022, 10:18 PM IST

21:32 June 26

ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांचे पोस्टर जाळले

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांच्याकडून टीका करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांचे पोस्टर जाळले आहे.

19:22 June 26

एकनाथ शिंदे आणि इतर आमदार राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये होते. त्यांना गेल्या 2.5 वर्षांत कोणतीही समस्या आली नाही. हे फक्त आजच का होते? हे फक्त निमित्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवटच्या क्षणापर्यंत पाठिंबा देऊ, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

18:14 June 26

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत (गुवाहाटीला) गेलेल्या इतर आमदारांनी नवीन युती करण्याचे सांगितले आहे, परंतु आम्ही स्थापन केलेल्या आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे धोरण स्पष्ट आहे. महाराष्ट्रात एमव्हीए सरकार आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देत राहू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

17:23 June 26

16:32 June 26

बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाई सुरू, शिवसेना नेते अरविंद सावंत यांची माहिती

  • महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू आहे. अनेक आमदार पक्षांतर करून आसाममध्ये गेले आहेत. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली असून आतापर्यंत 16 आमदारांना नोटीस बजावण्यात आली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

15:37 June 26

  • ज्यांना सोडायचे आहे आणि ज्यांना पक्षात परतायचे आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत. जे बंडखोर आमदार गद्दार असतील त्यांना पक्षात परत घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

15:03 June 26

  • महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे.

14:21 June 26

शिवसेना भवन येथे आज दुपारी 3 वाजता महत्वाची पत्रकार परिषद

शिवसेना भवन येथे आज दुपारी 3 वाजता महत्वाची पत्रकार परिषद. कायदेशीर बाबींबाबत माहिती देण्यात येईल. शिवसेना मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत आणि कायदेतज्ञ संबोधित करतील.

14:03 June 26

15 ते 16 आमदार संपर्कात, मात्र गद्दारांना माफी नाही - आदित्य ठाकरे

राजीनामा द्या आणि निवडणुकीला पुढे या, आम्ही तुम्हाला पाडू. 15 ते 16 आमदार संपर्कात आहे, मात्र गद्दारांना माफी नाही. बंडखोरांना आता विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, असे आदित्य ठाकरे मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यात म्हणाले.

13:57 June 26

नागपुरात गद्दार शिंदे मुर्दाबादचे नारे, शिवसेना संतप्त, गद्दारांना माफी नाही....

नागपूर

नागपूर - बंडखोरीननंतर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अनेक शहरात निदर्शने केले जात आहे. नागपूरच्या शिवसेनेच्या गणेशपेठ कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आज छोटेखानी बैठक झाली. यामध्ये सध्या सुरू असलेल्या बंडखोरी राजकीय नाट्याच्या विरोधात संतप्त भावना पदाधिकरी यांनी व्यक्त केलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थिती शिवसैनिक हे संतप्त झाले असुन त्यांनी एकनाथ शिंदे मुर्दाबादचे नारे लावत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हणत या घटनेचा जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला.

13:43 June 26

शरद पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानातून निघाले आहेत. एअरपोर्टच्या दिशेने निघाले आहेत. ते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

13:18 June 26

रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात, निवडक आमदारांच्या पत्नींशी संपर्क

शिवसेना पक्ष आणि सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही सहभाग घेतला आहे. बंडखोर आमदारांमधील काही आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.

13:15 June 26

सिल्लोडमध्ये बंडखोर आमदार अब्दुल सत्तार समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

सिल्लोडमध्ये बंडखोर आमदार अब्दुल सत्तार समर्थकांचे शक्तिप्रदर्शन.

12:58 June 26

एका बापाचे असाल तर राजीनामा द्या, संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान

एका बापाचे असाल तर राजीनामा द्या, असे संजय राऊत यांनी बंडखोरांना आव्हान केले आहे. तसेच, गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बीग बॉस असल्याचे ते म्हणाले.

12:54 June 26

'या' आमदारांना केंद्राकडून सीआरपीएफची सुरक्षा

रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनवणे, प्रकाश सुर्वे, सदानंद सरनावणकर, योगेश दादा कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जैस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणार, संदिपान भूमरे यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. : स्रोत

12:48 June 26

पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू

पुढील रणनीती आणि कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटी हॉटेलमध्ये बैठक सुरू. आज आणखी एक महत्त्वाची बैठक होऊ शकते: सूत्रांनी सांगितले

12:40 June 26

केंद्राकडून 15 बंडखोर शिवसेना आमदारांना वाय + श्रेणीची सीआरपीएफची सुरक्षा

केंद्र सरकारने 15 बंडखोर शिवसेना आमदारांना वाय + श्रेणीची सशस्त्र केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) सुरक्षा दिली आहे.

12:32 June 26

विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयावर शिंदे गट कायदेशीर सल्ला घेणार, नंतर न्यायालयात धाव घेणार

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयावर कायदेशीर मत मागवल्यानंतर एकनाथ शिंदे गट न्यायालयात धाव घेणार आहे. उपसभापतींनी बंडखोर आमदारांना नोटीसला उत्तर देण्यासाठी किमान ७ दिवसांचा अवधी द्यायला हवा होता, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

12:09 June 26

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या घरी केंद्राची सुरक्षा

बंडखोर आमदारांच्या घरी केंद्राची सुरक्षा.

12:05 June 26

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ लावलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांनी पेंट मारला

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ लावलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांनी पेंट मारला.

12:03 June 26

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांचे पुण्यात 'जुते मारो आंदोलन'

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी पुण्यात 'जुते मारो आंदोलन' केले.

11:57 June 26

ठाण्यात शिवसेनेच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर अज्ञातांनी काढून नेले

ठाण्यात शिवसेनेच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर अज्ञातांनी काढून नेले. उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शविणाऱ्या मजकुरावर काळे फासले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटना स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात. शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक यांच्यात संघर्ष. ठाण्यात तणावपूर्ण वातावरण.

11:46 June 26

शरद पवार आज दिल्लीला जाणार, राष्ट्रपतीपदासाठी सिन्हा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत असणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज मुंबईहून दिल्लीला रवाना होणार असून, ते 27 जून रोजी विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत असाणार आहेत.

11:30 June 26

मुंबईत शिवसेनेकडून बाईक रॅलीचे आयोजन

मुंबईत शिवसेनेकडून बाईक रॅलीचे आयोजन

11:27 June 26

मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मेळावा

मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मेळावा

11:06 June 26

बंडखोरी थोपविण्याकरिता युवा सेना रिंगणात, शिवसेना भवनात आज बैठक

मुंबई - शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या दुफळीमुळे सरकार अस्थिर झाले आहे. सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोर बैठका वाढवल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक शनिवारी पार पडली. आता युवासेना रिंगणात उतरली आहे. आज दुपारी दोन वाजता तातडीने बैठक बोलावली असून पुढील रणनिती आखली जाणार आहे. मात्र, बंडखोरांच्या पुत्रांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदार पुत्रांची धाकधूक यामुळे वाढली आहे.

10:55 June 26

शंभूराज देसाई यांच्या विरोधात पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी, २५ शिवसैनिक ताब्यात

सातारा - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात आक्रमक शिवसैनिकांनी आज सातार्‍यातील पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत निषेधाच्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी 25 शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

10:43 June 26

महाविकास आघाडी एकत्रित कायदेशीर लढा देणार

मुंबई- सिल्व्हर ओक बैठकीत महाविका आघाडी एकत्रित कायदेशीर लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे शरद पवार पुन्हा मैदानात उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे.

10:36 June 26

पुण्यात एकनाथ शिंदेविरोधात जोडे मारो आंदोलन

पुणे- पुण्यात शिंदेविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. पुण्याती शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाविरोधात संतप्त झाले आहेत.

10:31 June 26

७ बंडखोर मंत्र्यांचे मंत्रिपद काढून घेण्यासाठी शिवसेना राज्यपालांना देणार पत्र

मुंबई- ७ बंडखोर मंत्र्यांचे मंत्रिपद काढून घेण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. तसे पत्र शिवसेना राज्यपालांना देणार आहे.

10:22 June 26

बंडखोर आमदार बैठकीसाठी तयार, गुवाहाटीतील एकत्रित आमदारांचा फोटो आला समोर

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड थोपटले आहे. गुवाहाटीमध्ये तळ ठोकू असलेल्या आमदारांचा एकत्रित फोटो समोर आला आहे. आज दुपारी या आमदारांची बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलाविली आहे.

10:18 June 26

कोरोनातून बरे झाल्यानंतर राजभवनमध्ये राज्यपाल दाखल

मुंबई- कोरोनातून बरे झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी अल्पमतात आले आहे. त्यामुळे राजभवनमधील घडामोडींना महत्त्व येणार आहे.

10:14 June 26

गुवाहाटीत आमदारांनी एकमेकांचे कपडे फाडले तरी आश्चर्य वाटणार नाही- संजय राऊत

मुंबई - आजच पाच आमदारांशी बोलणे झाले. गुवाहाटीत आमदारांनी एकमेकांचे कपडे फाडले तरी आश्चर्य वाटणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आहे ते कोणाला घाबरत नाही. जे शरीराने तिथे आहेत मनाने आमच्यासोबत आहेत त्यांच्यासाठी दरवाजे ठेवलेले आहे

10:01 June 26

सिल्व्हर ओकमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची शरद पवारांबरोबर बैठक

मुंबई- सिल्व्हर ओकमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबरोबर होत आहे. महाविकास आघाडी सरकार टिकविण्याबरोबर बंड थोपविण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. अशा स्थितीत शरद पवार मैदानात उतरले आहेत.

09:52 June 26

शिवसेनेचे आज पुन्हा शक्तिप्रदर्शन, आदित्य ठाकरे दहिसरमध्ये घेणार युवासनेचा मेळावा

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना आज शक्तीप्रदर्शन करणार आहे. आदित्य ठाकरे हे दहिसरमध्ये मेळावा घेणार आहेत.

09:03 June 26

एकनाथ शिंदे आज गुवाहाटीमध्ये आमदारांची घेणार बैठक, 'ही' होणार चर्चा

मुंबई- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी हॉटेलमध्ये दुपारी १२ वाजता आमदारांची बैठक बोलावली, पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे सूत्राने सांगितले.

08:55 June 26

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

मुंबई- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे राजभवनमधील सूत्राने सांगितले आहे.

08:36 June 26

आदित्य ठाकरेंच्या धमकीवजा इशाऱ्याची आमदार नितेश राणेंनी उडविली खिल्ली

मुंबई- एअरपोर्ट ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो, असा धमकीवजा इशारा मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी एका बैठकीत दिला. या इशाऱ्याची खिल्ली आमदार नितेश राणेंनी उडविली. त्यांनी ट्विट करत म्हटले, माझ meow meow ऐकून थांबा बररर..का !!. ट्विटमध्ये त्यांना वाघासारखे मांजर असलेला फोटो जोडलेला आहे.

08:10 June 26

मालाड, मुंबई येथील शिवसेना शाखेत नमाज व कुराण पठण, कारण...

मुंबई येथील शिवसेना शाखेत नमाज

मुंबई- मुंबईतील मालाडमधील मालवणी भागात शिवसेना शाखेत मुस्लिम समाजातील मुलांनी नमाज आणि कुराण पठण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार टिकावे, शिवसेनेची सत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून जाऊ नये, अशी प्रार्थना होत असल्याचे दिसून आले आहे.

08:00 June 26

आदित्य ठाकरे बंडखोरीनंतर नाराज, म्हणाले...

मुंबई- महाराष्ट्रातील मागील 2-4 दिवसांवर नजर टाकली असता असे वाटते की ज्यांनी सोडले ते चांगले केले. कोरोनाच्या काळात ज्या व्यक्तीने सर्वात चांगले काम केले त्या व्यक्तीला आपले अधिकृत निवासस्थान सोडावे लागले, हे संपूर्ण देशाने पाहिले, अशी नाराजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

07:59 June 26

07:33 June 26

बंडखोर आमदारांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला...

मुंबई- एकनाथ शिंदे गटातील आमदारांना बहुतांश राज्यांमधील शिवसैनिकांकडून विरोध होत आहेत. सत्तेचा पेच सुटत नसताना बंडखोर आमदारांचा मुक्काम ३० जूनपर्यंत वाढल्याचे सूत्राने सांगितले.

07:20 June 26

गुवाहाटीमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचा टोला, म्हणाले..

मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे बंडखोर नेते गुवाहाटीत गेले आहेत. राज्यात मोठे राजकीय नाट्य येत असताना गुवाहाटीत शिवसेनेचे आमदार तळ ठोकून आहेत. त्यावर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की कब तक छीपोगे गोहातीमे.. आना हि पडेगा.. चौपाटीमे... त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा फोटो ट्विट केला आहे. विशेष म्हणजे उपाध्यक्षांनी नुकतेच या बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविली आहे.

07:00 June 26

शिंदे समर्थक माजी महापौर नरेश म्हस्के यांचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

नरेश म्हस्के

ठाणे -एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील पहिला राजीनामा म्हस्के यांनी दिला असून एकनाथ शिंदे याचे ते कट्टर समर्थक मानले जातात. गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी करत चाललेय त्याचा निषेध म्हणून मी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवर पेजवर केली आहे.

06:42 June 26

मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश

पोलीस आयुक्त

मुंबई- एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले नंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे गटासोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची संतप्त शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना यांचा संघर्ष आता रस्त्यावर देखील पाहायला मिळत असल्याची सध्याची मुंबईतील परिस्थिती आहे. हे पाहता मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. याच दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शनिवारी मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्त यांची बैठक घेतली त्यावेळी निर्देश देण्यात आले आहे.

06:38 June 26

साहेब आमच्यात मध्यस्थी करा, बंडखोर आमदार रमेश बोरनार यांची चंद्रकांत खेरै यांना फोनवरून विनंती

चंद्रकांत खैरे

औरंगाबाद - साहेब आमच्यात मध्यस्थी करा, अशी साद वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी सेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे घातली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी फोनवर संपर्क करत ही विनंती केली. यावर खैरे यांनीही तुम्ही या, मी मध्यस्ती करतो. तुमची उद्धव साहेबांशी भेट घडवून आणतो असे उत्तर दिले.

06:34 June 26

आमदार तानाजी सावंतच्या महाविद्यालयात जाऊन बार्शीत शिवसैनिकांचा गोंधळ

मुंबई- आमदार तानाजी सावंतच्या महाविद्यालयात जाऊन शिवसैनिकांनी बार्शीत गोंधळ घातला आहे. ही घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यात घडली आहे. शिवसैनिकांनी गोंधळ करून महाविद्यालयाच्या आवारात दगडफेक करत काचा फोडल्या आहेत.

06:22 June 26

काही बंडखोर आमदार दबावापोटी गेले आहेत - अरविंद सावंत

मुंबई- काही (बंडखोर आमदार) दबाव आणि भीतीपोटी गेले. त्यामुळेच त्यांना आसाममध्ये नेण्यात आले. अनेक आमदार आम्हाला परत यायचे आहेत, असे फोन करत असल्याचा दावा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

06:08 June 26

नागपुरात गद्दार शिंदे मुर्दाबादचे नारे, शिवसेना संतप्त, गद्दारांना माफी नाही....

मुंबई -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळेमहाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदेवर सातत्याने टीकास्त्र करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसैनिकांना भावनिक आवाहनं केलं ( Eknath Shinde On Shivsainik ) आहे. मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना अन् शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ( Eknath Shinde Criticized Mahavikas Aghadi ) आहे.

मुख्यमंत्र्यांचा इशारा - बंडखोर आमदारांच्या गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे नाव दिलं आहे. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

बंडखोरी करून शिवसेनेला आव्हान देणाऱ्या नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये गुप्त भेट झाली. एकनाथ शिंदे आसाममधून विशेष विमानाने एकटेच बडोद्याला गेले. येथे फडणवीस यांची भेटघेऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा केल्याचे बोलले जाते. अधिकृत सूत्रांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकाच आठवड्यात दुसरी भेट असल्याचे समजते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Mla Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) आव्हानाची भाषा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव ( Shivsena Leader Bhaskar Jadhav ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही वेळ आव्हानं देण्याची नाही, तर जोडण्याची वेळ आहे, असे जाधव यांनी म्हटलं आहे. ते चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आताच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेऊन शिवसेनेच्या बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता आता एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद ( Eknath Shinde Group press ) घेतली. युतीच्या काळात राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे पडलेल्या उमेदवार यांना मोठ्या प्रमाणात मान दिला जात होता. मात्र शिवसेना आमदारांसोबत दुजाभाव केला जात असतो. त्यांना योग्य प्रमाणात निधी दिला जात नाही. विकासकामे मंजूर केली जात नाहीत. अशी खदखदं ही दिपक केसरकरांनी शिवसेना आमदारांच्या मनात असल्याचे सांगितले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वातशिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केलेला आहे. कुठे त्यांना समर्थन भेटत आहे. तर कुठे त्यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ( Mumbai Shiv Sena Workers Aggressive On Shiv Sena Rebel MLA ) दादरमधील शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे जमले होते. त्यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी गद्दारांनी माफी अशी प्रतिक्रियाही दिला. या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुया नेमके शिवसैनिक कश्याप्रकारे बंडखोर आमदारांवर आक्रमक झाले आहेत.

Last Updated : Jun 26, 2022, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details