महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्ट घेण्याची विनंती करणारे 'ते' पत्र फेक - फडणवीस - महाविकास आघाडी

Maharashtra Political Crisis
महाविकास आघाडी संकटात

By

Published : Jun 28, 2022, 6:19 AM IST

Updated : Jun 28, 2022, 10:54 PM IST

22:49 June 28

फ्लोअर टेस्ट घेण्याची विनंती करणारे 'ते' पत्र फेक - फडणवीस

महाविकास आघाडीला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करायला सांगावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी राज्यपालांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी ही मागणी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी 30 जून रोजी विधानसभेत फ्लोअर टेस्ट घेण्याची विनंती करणारे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे ते फेक आहे.

21:55 June 28

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर दाखल

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर दाखल

21:06 June 28

उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक - सुभाष देसाई

उद्या, 29 जून रोजी पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यासाठीची वेळ रात्रीपर्यंत निश्चित केली जाईल. जोपर्यंत राज्य सरकारचा प्रश्न आहे, तेथे सर्व काही सामान्य आहे, असे मंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

19:29 June 28

बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला... याचा अर्थ काय

'एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याचीघाण,रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?,' असे ट्वीट शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

15:47 June 28

एकनाथ शिंदेंसह आम्ही आमच्या इच्छेने गुवाहाटीला आलो

आसाममधील गुवाहाटी येथून शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते एकनाथ शिंदेंसह आम्ही आमच्या इच्छेने गुवाहाटीला आलो आहोत. ते बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्व विचारधारा प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत, असे सांगितले.

14:56 June 28

देवेंद्र फडणवीस दिल्ली दाखल

राज्यातील महाविकास आघाडी ( MVA ) सरकारमधील सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्ली गाठली.

14:43 June 28

संजय राऊत यांना दुसरे समन्स; १ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

मुंबई - पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना नेते संजय राऊत यांना दुसरे समन्स पाठवले असून त्यांना १ जुलै रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

14:17 June 28

आमच्यासोबत ५० आमदार - एकनाथ शिंदे

मुंबई- महाविकास आघाडी संकटात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आमच्यासोबत ५० आमदार आहेत, असा दावा बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

14:17 June 28

13:12 June 28

मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार उपस्थित

मुंबई- आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड पॉझिटिव्ह असल्याने ते व्हीसीच्या माध्यमातून सामील होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

12:40 June 28

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींना आला वेग

देवेंद्र फडणवीस

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. कालच सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना १६ अपात्र आमदारासंदर्भामध्ये ११ जुलै पर्यंत त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी रवाना झाल्याने राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.

12:36 June 28

राज्य सरकारकडून रोज २०० ते ३०० जीआर जारी- प्रवीण दरेकरांचा आरोप

मुंबई-महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सध्या अस्थिर आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. ते दररोज 200-300 जीआर जारी करत आहेत. जनतेचा पैसा आहे. मी याबाबत राज्यपालांना विनंती केली आहे. त्यांनी सरकारला याची चौकशी करण्यास सांगितल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

12:17 June 28

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात राष्ट्रवादीने हॉटेलबाहेर लावले हॉटेल

मुंबई- शिवसेनेच्या बंडखोरांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने थेट गुवाहाटीतील हॉटेलबाहेर बॅनर लावले आहेत. "सारा देश देख रहा है, गुवाहाटी में छुपे गद्दरों को, माफ नहीं करेगा जनता ऐसे फर्जी मकारों को" असे लिहिलेले पोस्टर गुवाहाटीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावले आहे. बंडखोर आमदार शहरातील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

12:11 June 28

भाजपला सध्या तरी बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही- सुधीर मुनगंटीवार

मुंबई- भाजपला सध्या तरी बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीची जाहीर करण्याची वाट पाहत आहोत. त्यांच्याकडे नंबर नाहीत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

11:54 June 28

राज्यात महाविकास आघाडी संकटात, ईडीने उद्योगपती अविनाश भोसले यांचा घेतला ताबा

अविनाश राऊत

मुंबई- ईडीने उद्योगपती अविनाश भोसले यांचा ताबा घेतला आहे. अविनाश भोसले यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अविनाश भोसले यांचा ताबा ईडी अधिकाऱ्यांनी ऑर्थर रोड कारागृहातून घेतला आहे. उद्योगपती अविनाश भोसले हे काँग्रेसचे मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.

11:38 June 28

बहुमत आहे की नाही, याचे मविआने चिंतन करावे- सुधीर मुनगंटीवार

मुंबई- भाजपची भूमिका वेट अँड वॉचची आहे. अस्थिर मनाने संजय राऊत काहीही भाष्य करू शकतात. बहुमत आहे की नाही, याचे मविआने चिंतन करावे, असे भाजप नेते यांनी म्हटले आहे.

11:29 June 28

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना 21 जूनला फोन , चर्चा झाल्याची माहिती

मुंबई - राज्यातील राजकारण कोणत्या वळणावर पोहोचणार हे अजून अनिश्चित आहे. अशातच उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना 21 जूनला फोन झाल्याची चर्चा आहे. या दोघांमधील चर्चेचा तपशील समोर आलेला नाही.

11:02 June 28

आजही बैठकांचे सत्र: एकनाथ शिंदे गटाची दुपारी बैठक, मंत्रिमंडळाची होणार महत्त्वाची बैठक

मुंबई- एकनाथ शिंदे गटातील आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून ११ जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पुढील कृती आराखड्यासाठी एकनाथ शिंदे गटाची आज दुपारी बैठक होणार आहे. त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे राज्यातही मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे.

10:31 June 28

चर्चा करायची असेल तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात यावे- संजय राऊत

मुंबई- चर्चा करायची असेल तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात यावे, असे शिवसेनेचे संजय राऊत यांनी म्हटले. आम्ही घाबरणारे लोक नसल्याचेही त्यांनी सांगितले.

10:13 June 28

धर्मवीर सिनेमावर उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप- मनसे नेते अमेय खोपकरांचा आरोप

मुंबई - धर्मवीर सिनेमा चित्रपटगृहात दाखविला जात असताना त्यावर उद्धव ठाकरेंनी सेन्सॉरशिप लागू केल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून केला आहे. त्यांनी ट्विट करत राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? अशी टीका केली आहे. राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

10:06 June 28

बंडखोर आमदारांपैकी २० आमदार आमच्या संपर्कात- अनिल देसाई

मुंबई - शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारावरील अपात्रेचा निर्णय ११ जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला आहे. हा महाविकास आघाडी साठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी बंडखोर आमदारांपैकी २० आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. काही दगाफटका झाला तर ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला आहे

09:58 June 28

भाजप समर्थित अपक्ष आमदार सक्रिय, काय करणार हालचाल..

मुंबई- महाविकास आघाडी अल्पमतात येत असताना अपक्ष आमदारांचा गट सक्रिय होत आहे. भाजप समर्थित अपक्ष आमदार बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना पत्र देण्याची शक्यता आहे. राज्यपाल सक्रिय झाले असताना या घडामोडींना महत्त्व येणार आहे.

09:37 June 28

शिवसेनेला खिंडार पडली असताना संजय राऊत अलिबागच्या दौऱ्यावर

मुंबई-शिवसेनेला खिंडार पडले असताना संजय राऊत पक्ष संघटनेत सक्रिय झाल्याचे दिसत आहे. ते आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

09:33 June 28

प्रत्येक आमदारांचे मत महत्त्वाचे..राष्ट्रवादी सत्र न्यायालयात जाण्याची शक्यता

मुंबई-माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मतदाना करीता परवानगी मिळावी याकरिता राष्ट्रवादी सत्र न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर महाविकास आघाडीला फ्लोअर टेस्ट होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकरिता प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस याचिका करणार आहे.

09:29 June 28

३ दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती पाठवा- राज्यपाल यांचे मुख्य सचिवांना पत्र

मुंबई -शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना, मागील काही दिवसांमध्ये महाविकासआघाडी कडून मोठ्या प्रमाणामध्ये शासन आदेश(जीआर) काढण्याचा सपाटा सुरू झालेला आहे. या संदर्भामध्ये आता खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हस्तक्षेप करत २२,२३ व २४ जून या तीन दिवसांमध्ये किती शासन निर्णय काढण्यात आले, त्याची माहिती पाठविण्यात यावी अशा आशयाचे पत्र मुख्य सचिवांना पाठवल आहे.

09:03 June 28

राज्य सरकारने घाईघाईत घेतलेले निर्णय व जीआरचे स्पष्टीकरण द्या, राज्यपालांचे राज्य सरकारला आदेश

मुंबईत- विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घाईघाईने घेतलेले निर्णय आणि जीआर काढल्याबद्दल तक्रार केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दखल घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

08:39 June 28

राजकीय घडामोडींना वेग... एकनाथ शिंदे राज्यापालांची घेणार भेट?

मुंबई- शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात येत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद पेटला आहे. या घडामोडी सुरू असताना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेणार असल्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे.

08:10 June 28

वचन देतो, मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही - आमदार राहुल पाटील

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. दिवसागणिक एक एक आमदार गुवाहाटीत जाऊन शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेकडील आमदारांवर संशयाच्या नजरा आहेत. परभणीचे आमदार राहुल पाटील गुवाहाटीला गेल्याच्या चर्चा रंगली. अफवांवर विश्वास ठेवू नका, मी मतदार संघात आहे. तसेच मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, असे सांगत दिवसभराच्या चर्चेला आमदार राहुल पाटील यांनी पूर्णविराम दिला.

08:06 June 28

बंडखोरामधील २० ते २१ आमदार आमच्या संपर्कात - आदित्य ठाकरे

मुंबई- गुवाहाटीमधील बंडखोरामधील २० ते २१ आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांची अवस्था कैद्यांसारखी असल्याचा गंभीर आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

07:32 June 28

मुंबईत छावणीचे रुप येण्याची शक्यता

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात पडसाद उमटले आहेत. बंडखोर नेत्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक होत असताना त्यांच्या घराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राज्यपालांनीही निमलष्करी दल तैनात करण्याची सूचना दिल्यानंतर केंद्र सरकार ही सूचना अमलात आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत छावणीचे रुप येण्याची शक्यता.

07:27 June 28

संजय राऊत यांच्या निशाण्यावर पुन्हा बंडखोर नेते

मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक विचार ट्विट करत काही लोक म्हणजे जिवंत प्रेत असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

07:00 June 28

महाराष्ट्र हे पाप स्वीकारील का, सामनातून शिवसेनेची बंडखोरांसह भाजपवर टीका

मुंबई- राज्यात उलथापालथ होत असताना भाजप त्यापासून दूर असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात पडद्याआड भाजपच सक्रिय असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे. याविषयी सामनातून भाजपसह बंडखोर आमदारांचा समाचार घेतला आहे. सामनाच्या मुखपत्रात म्हटले, की भाजप जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दावने म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत,पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?

06:49 June 28

29 जूनला भाजप आमदारांना मुंबई येण्याच्या सूचना, भाजप सत्तास्थापनेच्या तयारीत?

देवेंद्र फडणवीस

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात बदलत असणारी सत्ता समीकरण पाहता भारतीय जनता पक्षाने सोमवारी आपल्या कोर कमिटीची बैठक बोलावली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली आहे. राज्यात होणाऱ्या सत्तेच्या उलथापालथ पाहता भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना आणि सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांना बुधवारी 29 जून सकाळपर्यंत मुंबई उपस्थित रहाण्याच्या सूचना कोअर कमिटीच्या बैठकीतून दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

06:29 June 28

बंडखोर आमदार रमेश बोरणारेंच्या मतदारसंघात शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन

शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

वैजापूर औरंगाबाद)-आमदार रमेश बोरणारे यांनी केलेल्या बंडानंतर औरंगाबादच्या वैजापूरमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे तथा आमदार व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आंबदास दानवे व शिवसेनेचे औरंगाबाद संपर्कप्रमुख विजय घोसाळकर यांची उपस्थिती होती. यांच्या उपस्थित मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनात ही बैठक पार पडली. या वेळी चंद्रकांत खैरे यांनी आमदार बोरणारे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या सोबतच मंत्री शिंदे यांच्यावरदेखील जोरदार टीकास्त्र सोडले.

06:02 June 28

आमच्यासोबत ५० आमदार - एकनाथ शिंदे

मुंबई -शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बंड आता कायदेशीर आणि राजकीय पातळीवरही सुरू आहे. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा आणि राजकीय पक्षांच्या हालचाली दिवसेंदिवस वाढत आहेत. महाविकास आघाडी टिकणार का, एकनाथ शिंदे गटाला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता येईल का, असे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासोबत शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरींना नोटीस बजावली आहे. तसेच, 5 दिवसांत आपली बाजू मांडत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलैला होणार असल्याने, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला ( Supreme Court Issues Notice Narhari Zirwal ) आहे.त्यासोबत न्यायालयाने शिवसेनेचे बंडखोर 39 आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि मालमत्तांची हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे सूचना महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत

हेही वाचा-Maharashtra Political Crisis : बंडखोरांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस

मुख्यमंत्री २१ जूनलाच देणार होते राजीनामा-विधान परिषदेची निवडणूक 20 जूनला पार पडल्यानंतर सायंकाळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपले समर्थक आमदारांसोबत आधी रस्ते मार्गाने सुरतला पोहोचले. त्यानंतर 21 जूनच्या रात्री विमानाने त्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटी गाठली. 21 जूनलाच सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक तसेच महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी संवाद साधताना झालेल्या प्रकरणानंतर आपण हताश झाल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते.

हेही वाचा-Uddhav Thackeray Planned to Resign : '21 जूनलाच मुख्यमंत्री देणार होते राजीनामा, पण शरद पवारांनी रोखले'

अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच-राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही. अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच होतो. कॅबिनेट मंत्री असो किंवा राज्यमंत्री असो आम्हाला कोणत्याच अधिकारांचे वाटप केले नाही, असा गंभीर आरोप बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी ( Shambhuraj Desai on CM ) केला.

हेही वाचा-Shambhuraj Desai on CM : अडीच वर्षे केवळ नावालाच राज्यमंत्री; शंभूराज देसाई यांचे गंभीर आरोप

भाजपबरोबर युती करा-शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा हा लढा ( battle of ideas Shiv Sena chief ) आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे, हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचे त्यांनी पत्रात लिहले आहे. उद्धव ठाकरेनी अमच्या भूमीकेचा विचार करून भाजप सोबत युती करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) यांनी आता भाजप, सेना युतीसाठी पत्र लिहाल ( Letter for BJP, Sena alliance ) आहे. या पत्रातून ही सन्मानाची लढाई असून बंडाची लढाई नाही असे म्हटले आहे. तसेच या पत्रातून शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा- Deepak Kesarkar Letter to CM : भाजपसोबत युती करा; दिपक केसकर यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

Last Updated : Jun 28, 2022, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details