मुंबई- शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी युट्यूब चॅनेल व महिलांच्या थेट लिलावाचे प्रसारण करणाऱ्या अॅपवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपले माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. पत्रात त्यांनी यु ट्यूब चॅनेल आणि महिलांचा थेट लिलाव प्रसारित करणाऱया अॅपवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या युट्यूब वाहिनीने विशिष्ट समाजातील महिलांचा थेट लिलाव प्रसारित केला असल्याचे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे म्हणणे आहे. सोशल मीडिया हँडलवरुन घेण्यात आलेले महिलांचे अनेक फोटो या अॅपवर पोस्ट करण्यात आल्याचेही त्या पत्रात म्हणाल्या आहेत.