मुंबई -महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जिल्हा पालकमंत्री म्हणून मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या जिल्हानिहाय नियुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेक दिवसांच्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते. आज बुधवारी पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा... राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा 'धुरळा', नागपुरात गडकरींसह फडणवीसांना धक्का
राज्यातील पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी ;
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांची पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
- पुणे - अजित अनंतराव पवार
- मुंबई शहर - अस्लम रमजान अली शेख
- मुंबई उपनगर - आदित्य उद्धव ठाकरे
- ठाणे - एकनाथ संभाजी शिंदे
- रायगड - आदिती सुनिल तटकरे
- रत्नागिरी - अॅड. अनिल दत्तात्रय परब
- सिंधुदुर्ग - उदय रविंद्र सामंत
- पालघर - दादाजी दगडू भुसे
- नाशिक - छगन चंद्रकांत भुजबळ
- धुळे - अब्दुल नबी सत्तार
- नंदुरबार - अॅड. के.सी. पाडवी
- जळगाव - गुलाबराव रघुनाथ पाटील
- अहमदनगर - हसन मियालाल मुश्रीफ
- सातारा - शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
- सांगली - जयंत राजाराम पाटील
- सोलापूर - दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
- कोल्हापूर - विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- औरंगाबाद - सुभाष राजाराम देसाई
- जालना - राजेश अंकुशराव टोपे
- परभणी - नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
- हिंगोली - वर्षा एकनाथ गायकवाड
- बीड - धनंजय पंडितराव मुंडे
- नांदेड - अशोक शंकरराव चव्हाण
- उस्मानाबाद - शंकरराव यशवंतराव गडाख
- लातूर - अमित विलासराव देशमुख
- अमरावती - अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
- अकोला - ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
- वाशिम - शंभुराज शिवाजीराव देसाई
- बुलढाणा - डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
- यवतमाळ - संजय दुलीचंद राठोड
- नागपूर - डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- वर्धा - सुनिल छत्रपाल केदार
- भंडारा - सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
- गोंदिया - अनिल वसंतराव देशमुख
- चंद्रपूर - विजय नामदेवराव वडेट्टीवार
- गडचिरोली - एकनाथ संभाजी शिंदे