भारतीय शेअर बाजाराचे Indian stock market बिगबुल Bigbull of Indian stock market आणि भारताचे वॉरेन बफे Indias Warren Buffett म्हणूनही ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी हैदराबादमधील मारवाडी कुटुंबात झाला. राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सामान्य शाळेतूनच केले. बी.कॉम आणि चार्टर्ड अकाउंटंट चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले. पुढे ते देशातील सर्वाधिक चर्चेत असलेले गुंतवणूकदार बनले. सध्या त्यांची एकूण संपत्ती ४.३ अब्ज डॉलर आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजे आज त्यांचे निधन Jhunjhunwala Life Journey झाले.
झुनझुनवाला यांचे बालपणराकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी हैदराबादमधील मारवाडी कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव राधेश्यामजी झुनझुनवाला असे होते. तर आईचे नाव उर्मिला झुनझुनवाला आहे. त्यांची आई ही एक गृहीणी होती. आणि त्यांचे वडील भारत सरकारच्या आयकर विभागात अधिकारी होते आणि ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. राधेश्यामजी झुनझुनवाला हे शेअर बाजाराच्या विषयावर नेहमी मित्रांशी चर्चा करत असे. राकेश हे या सर्व गोष्टी ऐकत असे. अवघ्या 14 वर्षांचे असतांना त्यांनी एक दिवस शेअर बाजारात भाव कसे चढ उतार होतात असा प्रश्न वडीलांना केला. तेव्हा वडिलांनी त्याला वर्तमानपत्र वाचण्याचा सल्ला दिला. शेअर बाजाराबद्दलचा हा त्यांचा पहिला धडा होता.
कुटुंबाविषयी माहीतीराकेश झुनझुनवाला यांना दोन भाऊ व दोन बहीनी आहेत. राकेश झुनझुनवाला यांचा मोठा भाऊ राजेश चार्टर्ड अकाउंटंट आहे. 22 फेब्रुवारी 1987 रोजी रेखा झुनझुनवालासोबत राकेश यांचा विवाह झाला होता. 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म RARE Enterprises सुरू केली. राकेश आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या नावाने ही फर्म सुरू आहे. RA म्हणजे राकेश आणि RE म्हणजे रेखा झुनझुनवाला. रेखा झुनझुनवाला या देखील शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. दोघांना एक मुलगी आणि दोन जुळी मुले आहेत. लग्नाच्या 17 वर्षानंतर 30 जून 2004 रोजी मुलगी निष्ठा हिचा जन्म झाला. राकेश आणि रेखा यांची जुळी मुले आर्यमन आणि आर्यवीर यांचा जन्म २००९ मध्ये झाला.