महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC BEST Issue : बेस्टचा ५ हजार कोटींचा महसूल वाचवा; काँग्रेस नेते रवी राजा यांचे पालिका आयुक्तांना पत्र

बेस्टचे ( BEST ) ५ हजार कोटींचे नुकसान होत असल्याची बाब पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा ( BMC Former Opposition Leader Ravi Raja ) यांनी निदर्शनास आणली आहे. हा महसूल बेस्टला मिळावा यासाठी निविदा प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी रवी राजा यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

best bus
best bus

By

Published : Jun 14, 2022, 10:20 PM IST

मुंबई - बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. महसूल मिळावा यासाठी बेस्टकडून २० वर्षांच्या कालावधीसाठी शेल्टर्सची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र निविदा प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. यामुळे बेस्टचे ( BEST ) ५ हजार कोटींचे नुकसान होत असल्याची बाब पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा ( BMC Former Opposition Leader Ravi Raja ) यांनी निदर्शनास आणली आहे. हा महसूल बेस्टला मिळावा यासाठी निविदा प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी रवी राजा यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

'बेस्ट उपक्रमाचे नुकसान होईल' :बेस्ट उपक्रम सध्या आर्थिक अडचणीत आहे. २२३६ कोटी रूपयांची तूट २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये एकट्या वाहतूक विभागाची तूट ही २२१० कोटी रूपये इतकी असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. बेस्टला पालिकेकडून ५ हजार कोटींची मदत करण्यात आली आहे. पालिकेकडून सतत मदत मिळेल याची शाश्वती नसल्याने बेस्टने स्वता महसूल वाढवण्याची गरज आहे. बेस्टने तसे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टने एप्रिल महिन्यात बस स्टॉप शेल्टर्सवर जाहिरात देण्यासाठीची कंपनी नेमण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली. यासाठी मे महिन्यात निविदापूर्व बैठकही झाली. या निविदा प्रक्रियेत पहिल्या कंपनीने निविदा प्रक्रियेतून बाहेर पडावे म्हणून दबाव आणत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. या निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी बोली लावली होती. त्यामध्ये प्रो अॅक्टीव्ह इन एण्ड आऊट एडव्हर्टायजिंग प्रा. लि. ने २४६५ कोटी रूपयांची बोली लावली. त्यापाठोपाठ साईनपोस्ट इंडिया प्रा. लि ने ८६१ कोटी रूपयांची बोली लावली. पृथ्वी आऊटडोअर पब्लिसिटी एलएलपी ५३८ कोटी रूपये, प्रकाश आर्ट्स पीटीव्ही लिमिटेड ४४० कोटी रूपये अशी बोली लावली होती. पण पहिल्या निविदाकार कंपनीला अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. यामुळे १६०० कोटी रूपयांचे नुकसान हे बेस्ट उपक्रमाचे होईल, असे राजा यांचे म्हणणे आहे. या विषयावर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


महसूल वाचवण्यासाठी प्रयत्न :मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने सभागृह आणि समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या बेस्टचे चेअरमन आणि बेस्ट समितीही अस्तित्वात नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला मिळणारा १६०० कोटी रूपयांचा महसूल आता अडचणीत आला आहे. म्हणूनच मुंबईचे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. येत्या तीन वर्षातील ५ हजार कोटी रूपयांचा बेस्ट उपक्रमाचा महसूल वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक आणि महानगरपालिका आयुक्तच हा महसूल वाचवतील, असा विश्वास असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Bunker To Raj Bhavan Revolutionary Gallery : बंकर ते क्रांतीकारकांची प्रेरणा गाथा सांगणारी गॅलरी; पाहा Video

ABOUT THE AUTHOR

...view details