मुंबई -लखीमपूर शेतकरी हत्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देश आणि राज्यातील विरोधक एकवटले आहेत. शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ येत्या ११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना सहभागी होणार आहे. 11 तारखेला कडकडीत बंद करूया असे आवाहन शिवसेना खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी केले आहे.
'महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न'
लखिमपुर मध्ये घडलेली घटना इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. खाजगी उद्योगांना पंजाब हरियाणात गोदाम टाकण्याची परवानगी मिळाली तेव्हा शेतकरी बिखरला आहे. या कायद्याने कामगारांना उध्वस्त केले. शेतकऱ्याला चिरडल बेछूट खाजगीकरण सुरू आहे. कायद्याने दिलेलं त्याची टाळलं जातं आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी 11 तारखेला महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होणार आहे. शिवसेनेची भारतीय कामगार सेना सहभागी होणार आहे. अजित पवार, अनिल परब यांच्या संबंधित घडलेल्या घटना महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.