मुंबई - मुंबईमध्ये सुमारे दीड कोटी नागरिक राहत असून त्यांना दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १७.३१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा हा पाणीसाठा कमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि धरणांमध्ये अपेक्षित पाऊस पडत नसल्याने पाणीसाठा कमी आहे. येत्या काही दिवसात अपेक्षित पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा -योग्यवेळी निर्णय घेणार, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ६५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा -
मुंबईला सात धरण आणि तलावांमधून रोज ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. वर्षभरात मुंबईकरांना १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. मुंबईमध्ये जूनच्या सुरुवातीला दहा दिवस पाऊस पडला होता. त्यानंतर अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या त्यामुळे तानसा, मोडकसागर, भातसा व मध्य वैतरणा या सर्वाधिक पाणी साठवणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची मोठी वाढ झालेली नाही. तलावांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ५० हजार ५१८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मुंबईला ६५ दिवस पुरेल इतकाच आहे.
- मागील दोन वर्षापेक्षा पाणीसाठा कमी -
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ५० हजार ५१८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये आजच्या दिवशी ३ लाख ३९ हजार ०६७ दशलक्ष लिटर तर २०१९ मध्ये ६ लाख ५२ हजार ७२८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. मागील दोन वर्षाची आकेवारी पाहिल्यास या वर्षी तलावांमध्ये पाणीसाठा कमी आहे.
- तर पाणीकपातीचा निर्णय -