महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये 4 वर्षांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी - Aarey Colony Leopard attack news

आरे कॉलनीमध्ये 4 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्ल्यावेळी उपस्थितांनी आरडाओरड केल्याने तसेच त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर बिबट्या पळून गेला.

Aarey Colony Leopard news
Aarey Colony Leopard news

By

Published : Sep 28, 2021, 11:49 AM IST

मुंबई - आरे कॉलनीमध्ये 4 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्ल्यावेळी उपस्थितांनी आरडाओरड केल्याने तसेच त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर बिबट्या पळून गेला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअरमध्ये उपचार सुरू आहेत. आयुष यादव, असे मुलाचे नाव आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी -

गोरेगाव (पूर्व ) आरे मध्ये राहणाऱ्या आयुष यादव या ४ वर्षीय मुलावर बिबट्याने काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जोरदार हल्ला केला. सुदैवाने आयुषचे मामा विनोद कुमार यादव यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यावर व कपाळावर एकूण 7 टाके पडले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका 8 वर्षीय मुलावरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे सततच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनखात्याने गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - प्रचारादरम्यान शिवसेनाप्रणित आमदाराची जीभ घसरली; काँग्रेस, राष्ट्रवादीवर खालच्या भाषेत टीका

ABOUT THE AUTHOR

...view details