Mumbai APMC Market Rate एपीएमसी मार्केटमध्ये लिंबांनी खाल्ला भाव तर वाटाण्याच्या दरात झाली घट
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज वाटाण्याच्या दरात मोठी घट झाली आहे. तर लिंबांच्या दराने चांगलाच भाव खाल्ला आहे. इतर भाजीपाल्यांचा दर स्थिर असल्याने गृहिणींच्या बजेटला कोणताही झळ पोहोचली नाही.
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC Market १०० किलोंप्रमाणे वाटण्याच्या Green Peas Rate Reduce In Mumbai दरात १ हजार रुपयांची घट झाली आहे.१०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगांच्या दरात २ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गवारच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबांच्या Lemon Rate Increase In Mumbai APMC Market दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
- भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३६०० रुपये
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७०० रुपये ते ३००० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६५०० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
- कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९००० रुपये ते १२००० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २४००रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४०००रुपये
- मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
पालेभाज्या
- कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये
- कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
- मेथी नाशिक प्रति १०० जुडया १६००रुपये ते २००० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २५०० रुपये ३५००
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या ९०० रुपये ते १००० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ७००रुपये ते ८०० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये