मुंबई :किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत राज्यातील बड्या नेत्यांवर आरोप ( Allegations made by Kirit Somaiya ) केलेत. त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आमदार तसेच नेत्यांचा समावेश आहे. यातील अनेकांवर आजपर्यंत ईडी तसेच इतर यंत्रणांचा ससेमिरा मागे ( Action after allegations of Kirit Somaiya ) लागला आहे. टाकूयात कुणाकुणावर काय आणि कशी झाली कारवाई.
सोमय्यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपांचा याचा आढावा -किरीट सोमय्यांनी गेल्या काही वर्षांपासून विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आतापर्यंत त्यांनी कोणत्या नेत्यांवर आरोप केले याबाबत जाणून घेऊया.
अजित पवार - किरीट सोमय्यांनी मार्च 2016 मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रश्न आरोप केले होते. 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा पवार जलसंपदा मंत्री असताना झाल्याचा ठपका आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात सहभाग असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.
अशोक चव्हाण -राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात आदर्श गृहनिर्माण सोसायटीमधील घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्याप्रकरणी नोव्हेंबर 2010 मध्ये चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला.
छगन भुजबळ - राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामामध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच, भुजबळ यांनी आर्मस्ट्रॉंग कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनीसुद्धा बनावट असल्याचा आरोपही भुजबळ यांच्या विरोधात केला होता.
नारायण राणे -विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातही या पूर्वी किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप केला होता. राणे यांचे नीलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
प्रताप सरनाईक -शिवसेनेचे आमदार आणि विहंग ग्रुपचे मालकप्रताप सरनाईक यांच्या विरोधात 250 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनीही शंभर कोटींचा मानहानीचा दावा सोमय्यांविरोधात ठोकला आहे.
भावना गवळी -शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही सोमय्यांनी केली आहे.
मिलिंद नार्वेकर -शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात समुद्रकिनारी बंगला बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.