महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 3, 2021, 5:09 PM IST

Updated : Apr 3, 2021, 5:24 PM IST

ETV Bharat / city

कोरोनापेक्षा महामंडळाच्या नियुक्त्या ठाकरे सरकारला महत्त्वाच्या वाटतात - प्रवीण दरेकर

राज्य कोरोनाच्या महाभयंकर संकटात असताना या राज्यातील सत्ताधाऱ्यांना महामंडळांच्या नियुक्त्या आणि निधी वाटपावरून होत असलेला गोंधळ हा सगळा महत्त्वाचा विषय वाटतो का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेला आहे

leader of opposition praveen darekar
leader of opposition praveen darekar

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या आकडेवारीने उच्चांक गाठलेला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि काँग्रेसवर होत असलेला अन्याय आणि निधी वाटपाचा दुजाभाव यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवलं. किमान समान कार्यक्रमाअंतर्गत हे सरकार राबवा, अशी मागणी देखील यावेळेस केलेली आहे. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका करत, हे राज्य कोरोनाच्या महाभयंकर संकटात असताना या राज्यातील सत्ताधाऱ्यांना महामंडळांच्या नियुक्त्या आणि निधी वाटपावरून होत असलेला गोंधळ हा सगळा महत्त्वाचा विषय वाटतो का? असा सवाल या वेळेस त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाढता कोरोना संसर्गावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री हतबल झालेले आहेत त्यामुळेच ते निर्णय लवकर घेऊ शकत नाहीच, अशी टीका यावेळेस प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे. आज काँग्रेसच शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर भेटायला गेले होते. या बैठकीमध्ये महामंडळांच्या नियुक्त्या आणि निधी वाटपावरून होत असलेला दुजाभाव या गोष्टींवर चर्चा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सरकारला कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचे गांभीर्य वाटत आहे का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आणि लोकांनी या राजकारण्यांचा खरा चेहरा पाहणं खरंतर गरजेचे आहे, अशी टीका या वेळेस प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे महाविकास आघाडीची चर्चा होत आहे. परंतु डॉक्टर आणि नर्स यांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा करायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. यावरून कोरोना बाबतीत सरकारच्या संवेदना दिसून येतात. केवळ डॉक्टर द्या नर्स द्या बोलून चालणार नाही तर त्यांना तात्काळ नियुक्त्याही द्यायला हव्यात.

मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाला ही सुरक्षित ठेवू शकले नाहीत - प्रवीण दरेकर

राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाढत्या कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या फेसबुक लाईव्हवर टीका केलेली आहे मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाचाही संरक्षण करू शकले नाहीत, अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

आव्हाडांना आम्ही आकडेवारी देऊ -

आव्हाड म्हणतात २० लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले. आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आलेत एकदा तपासून पाहावे. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे बेड, व्हेंटिलेटर, मास्क, कोरोना लस अशा वेगवेगळ्या गोष्टी आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. तसेच अन्नधान्यापासून ते मजुरांच्या राहण्यापर्यंतची व्यवस्था ही केंद्र सरकारने केलेली आहे. त्याची कल्पना आव्हाडांना नसावी पण आम्ही आव्हाडांना त्याची आकडेवारी पाठवून देऊ, असं सांगतानाच केवळ अपयश आल्याने आघाडी सरकारकडून भावनिक आव्हान केले जात आहे आणि लोकांना संभ्रमित केले जात आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड आणि सरकारवर केली आहे.

आम्ही पूर्वीपासूनच रस्त्यावर आहोत -

मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये आम्ही रस्त्यावर पहिल्या लॉकडाऊनपासून उतरलेलो आहे. तुम्ही मातोश्रीत बसून होतात त्या काळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो पण तुम्ही लोकांमध्ये जाऊन लॉकडाऊनमुळे होणारं त्यांच नुकसान समजून घ्या, असा सल्लाही या वेळेस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेला आहे.

Last Updated : Apr 3, 2021, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details