मुंबई - घाटकोपर पूर्व-पश्चिमला जोडणारा लक्ष्मीबाग नाल्यावरील महापालिकेने बंद केलेला पूल १५ दिवसात वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी दिली. त्या आज या भागात पालिका अधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.
घाटकोपरच्या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल १५ दिवसात वाहतुकीसाठी खुला होणार - राखी जाधव - Bridge
लक्ष्मीबाग नाल्यावरील घाटकोपर आगारा जवळील पूल धोकादायक असल्याने महापालिकेने १८ दिवसापूर्वी बंद केला होता. त्यामुळे घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती, मात्र, हा पूल लवकरच सुरू होणार आहे.
लक्ष्मीबाग नाल्यावरील घाटकोपर आगारा जवळील पूल धोकादायक असल्याने महापालिकेने १८ दिवसापूर्वी बंद केला होता. त्यामुळे वाहनधारकांना पूर्वेकडून पश्चिम दिशेला येण्यासाठी १०-१२ किलोमीटरचा फेरा पडत होता. तसेच घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती, मात्र, हा पूल लवकरच सुरू होणार आहे.
लक्ष्मीबाग नाल्यावरील हा पूल धोकादायक असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुढचे ४ महिने हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळी जाधव यांनी पालिकेच्या पूल विभाग आणि आयआयटीच्या तपासणी पथकासोबत पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलावरून छोटी वाहने जाण्यासाठी काही तरी उपाययोजना करा, अशी मागणी केली. त्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये पुलाची डागडुजी करून लहान वाहनांसाठी हा पूल खुला केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.