मुंबई -शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर ( Shivsena Rebel MLA ) शिवसेनेने कारवाई सुरू केली आहे यासंदर्भात विधिमंडळात कारवाईसाठी पत्र दिले असताना आता शिवसेना सर्वोच्च न्यायालयातही लढाई लढणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांना अपात्र करण्याविषयी विधिमंडळाला प्रस्ताव दिला आहे त्यावर विधानसभा उपाध्यक्ष योग्य कारवाई करतीलच. मात्र आता ही लढाई केवळ राजकीय राहिलेली नाही तर ती न्यायालयीन सुद्धा होत आहे त्यामुळे आता ही लढाई न्यायालयातही लढली जाईल असे शिवसेना खासदार आणि प्रवक्ता अरविंद सावंत ( Arvind Savant ) यांनी आज मुंबईत सांगितले.
Kamat On Rebel MLAs Suspension : शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र होणारच, सेनेचे वकील कामतांचा दावा - Arvind Savant
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Leader Eknath Shinde ) यांची बंडखोरी त्यांच्यावर उलटण्याची शक्यता आहे. शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई सुरू केले असून बंडखोर आमदार अपात्र होणारच, असा दावा शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.
न्यायालयीन लढाई -शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी अद्याप कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत ते कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीत विलीन होत नाहीत तोपर्यंत ते शिवसेनेचे बंडखोर आमदार मानले जातील आणि त्यामुळे ते कारवाईस पात्र आहेत, अशी माहिती ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी दिली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना तयारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आमदारांना पक्ष शिस्तीच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. कायद्यानेही तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे कारवाई होऊ शकते. तसेच सरकारवर अविश्वास दाखवणारा एक ईमेल विधानसभा उपाध्यक्षांना आला आहे. मात्र, तो वैध ई-मेलद्वारे आलेला नाही, त्यामुळे त्याची सत्यता संशयास्पद आहे. तसेच एक पत्र कुरियरद्वारे मिळाले आहे. मात्र, त्याचीही स्वच्छता नसल्याने विधानसभा उपाध्यक्ष यांनी ते फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी या आमदारांवर कारवाई करून त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया न्यायालयीन खटल्याद्वारे सुरू करण्यात येणार असल्याचेही देवदत्त कामत यांनी सांगितले.
हेही वाचा -Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना