मुंबई -एसटीला शासनात विलीन करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना 70 वर्षात जमले नाही ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी करून दाखवावे, अशी सूचना अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना केल्या आहेत. आज कामगार नेत्याबरोबर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई सेंट्रल वरील एसटी मुख्यालयात बैठकीला बोलवले होते. या बैठकीत अनिल परब यांनी राज्याचे महाधिवक्ता यांच्याशी विलिनीकरणावर तातडीने चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
पत्रकारांशी बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी केल्या सूचना- परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बातचीत केली या दरम्यान सदावर्ते यांनी सांगितले की, गेल्या १२ दिवसांपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (st employee strike) सुरू आहे. मात्र या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यभरात मोठ्या संयमाने सुरू आहे. आत्तापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी चुकीची आक्रमकता दाखवलेली नाही. ही संयमाची आक्रमकता आहे. कोणत्याच गाडीवर दगड मारलेला नाही, शिवीगाळ नाही. मात्र, खोटे आरोप एसटी कर्मचाऱ्यांवर करण्यात येत आहेत. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. आज कामगारांच्या मागणीनंतर मी परिवहन मंत्र्यांच्या बैठकीला आलो होतो. त्यांना आम्ही काही सूचना केल्या आहेत. परिवहन मंत्री यांनी सुद्धा आमच्या सूचना मान्य केलेल्या आहेत.
राज्याचे महाधिवक्ताशी करणार चर्चा -
परिवहन मंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीची माहिती गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी माध्यमांना देत असताना सांगितले की, अनिल परब सांगतात की, चर्चेसाठी आमचे दार नेहमी उघडे आहे. मात्र आतापर्यंतच्या चर्चेनंतर ही संपावर (st employee strike) तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आम्ही एसटी महामंडळ शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी महाधिवक्ता बरोबर चर्चा करा, अशा सूचना आम्ही बैठकीत सुचवल्या आहेत. परिवहन मंत्री यांनी यासूचना मान्य केल्या असून येत्या काही दिवसात, राज्याचे महाधिवक्ताबरोबर एसटीचा विलीनीकरणावर चर्चा करणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्याकडे संधी -
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एक उत्तम संधी आहे. एसटीला शासनात विलीन करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांना 70 वर्षात जमले नाही ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी करून दाखवावे आणि एसटी कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब केली आहे.
विलिनीकरणा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही - सदावर्ते
विलिनीकरणाच्या संदर्भात आणि आर्थिक बोजा तसेच कायदेशीर बाबी जे आम्ही मंत्री म्हणून कायदेशीर पाठवल्या आहेत. त्या अर्थानेच आम्ही म्हणालो की ज्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे. अशा कुणाला सुद्धा चुकीच्या अर्थाने पोच करू नका. म्हणजेच स्वर्गीय दत्ता सामंत हे कष्टकऱ्यांचे पुढारी होते. त्यांच्याप्रती शरद पवार जे बोलत आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य पुढे करण्यात येऊ नये. अशी माफक इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, आमची भूमिका नकारात्मक नाही. देशातल्या इतर ठिकाणी आम्ही जे विलिनीकरण केलं. त्यासंदर्भातील माहिती आम्ही मागवली आहे. असं अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी म्हटले आहे.