महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Silver Oak Attack : वकील गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी एलटीटी मार्ग पोलीस ठाण्यात.. इतर आरोपी 'यलो गेट'ला - गुणरत्न सदावर्ते एलटीटी मार्ग पोलीस स्टेशन

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या ( NCP Leader Sharad Pawar ) घरावरील हल्लाप्रकरणी ( Silver Oak Attack ) अटक करण्यात आलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी एलटीटी मार्ग पोलीस ठाण्यात ( Gunratna Sadavarte LTT Marg Police Station ) करण्यात आली असून, इतर आरोपींना यलो गेट पोलीस ठाण्यात ( Yellow Gate Police Station ) ठेवण्यात आले आहे.

वकील गुणरत्न सदावर्तेची रवानगी एलटीटी मार्ग पोलीस ठाण्यात.. इतर आरोपी 'यलो गेट'ला
वकील गुणरत्न सदावर्तेची रवानगी एलटीटी मार्ग पोलीस ठाण्यात.. इतर आरोपी 'यलो गेट'ला

By

Published : Apr 9, 2022, 10:23 PM IST

मुंबई :शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी ( Silver Oak Attack ) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte Police Custody) यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांना सध्या LTT मार्ग पोलीस स्टेशममध्ये ठेवण्यात नेण्यात आले ( Gunratna Sadavarte LTT Marg Police Station ) आहे. तर इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना येलो गेट पोलीस स्टेशममध्ये ( Yellow Gate Police Station ) ठेवण्यात येणार आहे. उद्या रविवारी असल्याने उद्याही जेलमध्ये पाठवणार नाहीत. आता सोमवारी कर्मचाऱ्यांना जेलमध्ये नेलं जाणार आहे.

चौकशीला घेऊन जाणार : वकील गुणरत्न सदावर्ते यांना सध्या LTT मार्ग पोलीस स्टेशममध्ये ठेवण्यात नेण्यात आले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी गावदेवी पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक घरावर 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत हल्ला केला होता. याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० आरोपीना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होता. न्यायमूर्ती सावंत यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. यानंतर सदावर्ते यांच्यासह सर्व आरोपींची चौकशी कारण्याची गरज असल्याने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी जयश्री पाटील व महेश वासवानी यांनी बाजू मांडली. तर सरकारच्यावतीने प्रदीप घरत यांनी बाजू मांडली.

ABOUT THE AUTHOR

...view details