मुंबई -कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पूर्ण प्रादुर्भाव जर कमी करायचा असेल तर लसीकरण हाच एक मार्गसध्या दिसत आहे. यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. त्याच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशातील पहिल्या 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार आहे.
दादरच्या कोहिनूर स्क्वेअर टॉवरच्या पार्किंग लॉटमध्ये देशातील पहिल्या ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील पहिला प्रयोग -
हा पहिलाच प्रयोग देशात राबविण्यात आला आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रांगेत खूप अडचण निर्माण होतात. मात्र, या प्रयोगामुळे त्यांना काही प्रमाणात आराम मिळणार आहे. लसीकरण मोहिमेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशानं हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
लोकार्पणा आधीच लसीकरण -